Vadapav Day Recipe: लुसलुशीत पाव, शेंगदाण्याची तिखट चटणी आणि कुरकुरीत तळलेला गरम वडा म्हणजे अस्सल मुंंबईकराचा विक पॉइंट,या अस्सल देशी फास्ट फूडची चर्चा केवळ मुंंबई, महाराष्ट्र किंंवा भारतापर्यंतच नसुन जगात पसरलेली आहे. मुंंबईत राहुन गेलेल्या किंंवा निदान एकदा भेट दिलेल्या कुठल्याही व्यक्तीला विचारा तो तुम्हाला वडापावची एक ना एक स्टोरी नक्की सांगेल कारण हा फक्त एक पदार्थ नसुन प्रत्येकाला आलेली अनुभुती आहे. याच पदार्थाचं आपल्या आयुष्यातील स्थानाचं सेलिब्रेशन करण्यासाठी आज 23 ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिवस (World Vadapav Day 2020) म्ह्णून साजरा केला जातो. मागील तब्बल पाच महिन्यांंपासुन लॉकडाउन (Lockdown) मध्ये अडकुन पडल्याने आपल्यापैकी अनेकजण या वडापावला मिस करत असतील, हो ना? पण काळजी करु नका अगदी वडापावच्या गाडी वर खाल्ल्यासारखा अनुभव तुम्ही घरी सुद्धा घेउ शकाल. यासाठी ही खास मुंंबई स्टाईल ची वडापावची रेसिपी आम्ही आज शेअर करणार आहोत.
World Vada Pav Day: मुंबई मधील या '7' वडापावची चव नक्की चाखाच!
घरी कसा बनवाल Street Style वडापाव
बरं का, वडापावची खरी मजा ही चटणीत असते असंं म्हणतात. घरी बनवता येईल अशी शेंगदाण्याच्या झणझणीत चटणीची रेसिपी सुद्धा आपण पाहुयात, एक टीप अशी की तुम्ही वडे तळताना थोडं बेसन पिठाचं बॅटर तेलात तळुन ते कुरकुरीत झाल्यावर चटणी मध्ये घालून वाटुन घेतल्यास चव आणखीन वाढते. तसेच चटणीत थोडा लिंंबाचा रस सुद्धा टाकून पाहा.
वडापावची चटणी
दरम्यान, वडापाव हा जवळपास 1966 पासुन मुंंबईकरांंच्या मनावर राज्य करत आहे. आज घडीला प्रत्येक गल्लीत कोपर्यात वडापावच्या स्पेशल गाड्या आहेत. यापैकी तुमच्या आवडीचा वडापाव कोणता हे आम्हाला सुद्धा नक्की कळवा.