World Elephant Day 2024: जागतिक हत्ती दिन; इतिहास, महत्त्व आणि जगभरात सुरु असलेले प्रयत्न, घ्या जाणून
हा दिवस अधिवास नष्ट होणे, हस्तिदंती शिकार, मानव-हत्ती संघर्ष आणि या भव्य प्राण्यांसाठी सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षीतता, त्यांचे संवर्धन यांसाठीचे प्रयत्न आणि आवश्यकता अधोरेखीत करतो.
Elephant Conservation: पृथ्वीवरील ज्ञात वन्य प्राण्यांमध्ये सर्वात मोठा आणि अवाढव्य म्हणून ओळखला जाणारा प्राणी म्हणजे हत्ती(Elephant). जगभरामध्ये भौगोलिक स्थानांनुसार हत्तीच्या प्रजातिंमध्ये विविधता आढळते. मात्र, मानवी लालसा आणि भौगोलिक बदल यांमुळे या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी जागतिक स्तरावर हत्तींचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या तातडीच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्याची संकल्पना पुढे आली. या संकल्पनेतून दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी जागतिक हत्ती दिन (World Elephant Day 2024) साजरा केला जातो. हा दिवस अधिवास नष्ट होणे, हस्तिदंती शिकार, मानव-हत्ती संघर्ष आणि या भव्य प्राण्यांसाठी सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षीतता, त्यांचे संवर्धन यांसाठीचे प्रयत्न आणि आवश्यकता अधोरेखीत करतो.
जागतिक हत्ती दिन इतिहास आणि 2024 ची संकल्पना
यंदाच्या वर्षी हत्ती दिनानिमित्त खास संकल्पना आखण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रागैतिहासिक सौंदर्य, ब्रह्मज्ञानविषयक प्रासंगिकता, आणि पर्यावरणीय महत्त्व यांवर जोर देण्यात आला आहे. ही संकल्पना खोल सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्वावर भर देते. जागतिक हत्ती दिनाची स्थापना 12 ऑगस्ट 2012 रोजी कॅनडातील पॅट्रिशिया सिम्स आणि थायलंडच्या एलिफंट रीइंट्रोडक्शन फाउंडेशन यांनी केली होती. हा प्रकल्प थायलंडच्या HM राणी सिरिकिट यांनी सुरू केला होता. तेव्हापासून, Patricia Sims यांनी जागतिक उपक्रमाचे नेतृत्व केले आहे. ज्याने हत्तींच्या संवर्धनासाठी समर्पित 100 हून अधिक संस्थांसोबत भागीदारी केली आहे. हा दिवस जगभरातील लाखो लोकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचला आहे, त्यांना हत्तींच्या संरक्षणाच्या प्रयत्नात एकत्र आणले आहे. (हेही वाचा, Elephant Viral Video: रुग्णालयात दाखल केअरटेकरला भेटायला आला हत्ती, गुडघ्यावर बसून व्यक्त केले प्रेम, पाहा व्हिडीओ)
जागतिक हत्ती दिनाचे महत्व
पर्यावरणाचा समतोल राखण्यात हत्ती महत्त्वाची भूमिका बजावतात. ते मुख्य चर आणि जीवांचे वहन करणारे म्हणून काम करतात. दररोज ते मोठ्या प्रमाणात वनस्पती खातात, झाडांशी खेळात, ज्यामुळे बिया विखुरतात आणि सृष्टीवरील हिरवळीला आकार देण्यास मदत करतात. आशियाई जंगलांमध्ये, हत्ती दाट वनस्पतींमध्ये अंतर निर्माण करतात. ज्यामुळे नव्या वनस्पती, रोपटी, झाडे यांच्यापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचतो आणि जंगलांच्या नैसर्गिक पुनरुत्पादनात मदत करतो. (हेही वाचा, Z Class Security For Baby Elephant: हत्तीच्या पिल्लाला पालकांकडून 'झेड प्लस सुरक्षा'; मनमोहक दृश्य सोशल मीडियावर व्हायरल (Watch Video))
जागतिक हत्ती दिन व्यक्ती आणि संस्थांना एकत्र येण्यासाठी आणि हत्तींना भेडसावणाऱ्या धोक्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते. सामूहिक प्रयत्नांद्वारे, सरकार, नागरिक आणि कायदेकर्ते संवर्धन धोरणांवर काम करू शकतात ज्यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी हत्ती आणि त्यांच्या निवासस्थानांचे संरक्षण होईल. हा वार्षिक कार्यक्रम हा भव्य प्राणी आणि त्यांच्या नैसर्गिक वातावरणाचे रक्षण करण्याच्या मानवाच्या जबाबदारीची आठवण करून देतो. शाश्वत भविष्याची खात्री करून देतो जेथे हत्ती शोषणापासून मुक्त जंगलात वाढतात.