Sun | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Winter Solstice 2022: भारतात हिवाळी संक्रांती गुरुवार, २२ डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. हिवाळी संक्रांती किंवा हायबरनल संक्रांती हा वर्षातील सर्वात लहान दिवस किंवा सर्वात मोठी रात्र म्हणून साजरी केली जाते. हिवाळी संक्रांती  हा दिवस अनेक दशकांपासून साजरा केला जातो. सहसा हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्र मोठ्या असतात. हिवाळी संक्रांतीनंतर, दिवस पुन्हा थोडे मोठे होऊ लागतात.  हिवाळी संक्रांती ही  पृथ्वीचा एक ध्रुव दूर सरकल्यामुळे आणि सूर्यापासून आणखी दूर गेल्यामुळे होते. हिवाळी  संक्रांतीच्या दिवशी उत्तर गोलार्ध सूर्यापासून दूर असतो तर दक्षिण गोलार्धात खगोलीय उन्हाळा या वेळी सुरू होतो.

हिवाळी संक्रांती 2022 ची तारीख, वेळ आणि महत्त्व याबद्दल जाणून घेऊया 

हिवाळी संक्रांती 2022: तारीख आणि वेळ

हिवाळी संक्रांती 2022 गुरुवार, 22 डिसेंबर 2022 रोजी साजरी केली जाईल. या वर्षी संक्रांतीची वेळ भारतातील नवी दिल्ली येथे 3:18 IST असेल.

  हिवाळी संक्रांती 2022 चे महत्त्व 

 हिवाळी संक्रांती ही वर्षातील सर्वात मोठी रात्र आणि सर्वात लहान दिवस म्हणून साजरी केली जाते.

अनेकांच्या मते, हिवाळी संक्रांती म्हणजे अंधाराचा अंत आणि सूर्य आणि प्रकाशाचा पुनर्जन्म होय.

ख्रिश्चन लोक हिवाळी संक्रांती ही महत्त्वाची घटना मानतात. त्यांच्यासाठी ही पृथ्वीवरील ख्रिस्ताची उदयाची सुरुवात आहे. हिवाळी संक्रांती ख्रिसमसच्या आसपास येत असल्याने, ख्रिस्ती धर्मात याला खूप महत्त्व आहे.