वटपौर्णिमा । File Photo

ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेचा दिवस म्हणजे वट पौर्णिमा (Vat Purnima). महाराष्ट्रामध्ये सवाष्ण महिलांसाठी हा दिवस अत्यंत खास असतो. यंदा 24 जून दिवशी वट पौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवसाच्या निमित्ताने महिला पती उपवास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाभोवती फेर्‍या मारून वट सावित्रीचं व्रत पूर्ण करतात. आज डिजिटल मीडीयाचा काळ आहे. बाहेर पडून वट सावित्रीचं व्रत करण्यासोबतच तुमच्या साथीदाराला या सणाच्या निमित्ताने वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Status, WhatsApp Stickers, Wishes, Facebook Messages, GIFs, HD Images, Greetings, Quotes पाठवून एकमेकांची साथ कायम निभावण्यासाठी एक वचन नक्की देऊ शकता. त्यासाठी लेटेस्टली मराठी कडून देण्यात आलेली ही शुभेच्छापत्र तुम्ही नक्कीच डाऊनलोड करून शेअर करू शकता. Vat Purnima 2021 Ukhane: वट पौर्णिमेच्या या खास उखाण्यांनी पूर्ण करा मैत्रिणी, घरातील वडिलधार्‍यांचा हट्ट.

महाराष्ट्रात नववधूंसाठी वटपौर्णिमेचा सण खास असतो. वडाचं झाड हे पर्यावरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं झाडं आहे. वडाच्या झाडाचं आयुष्य अधिक असते. त्याच्या पारंब्या त्याचा अजून विस्तार करातात. वडाच्या झाडाची प्रातिनिधिकपणे पूजा करून हीच गोष्ट आपल्या आयुष्यात, कुटुंबातही यावी म्हणून कृतज्ञतेच्या भावनेतून पूजा केली जाते.

वटपौर्णिमेच्या मराठी शुभेच्छा

वटपौर्णिमा । File Photo

सण सौभाग्याचा, सण अतुट बंधाचा

वटपौर्णिमेच्या या पवित्र दिनी पूर्ण

होवोत तुमच्या सार्‍या आशा-आकांक्षा

वटपौर्णिमेच्या शुभेच्छा

वटपौर्णिमा । File Photo

सत्यवान-सावित्री प्रमाणे

तुमची जोडी देखील

साताजन्मी अबाधित रहावी

हीच आमची सदिच्छा

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

वटपौर्णिमा । File Photo
वटपौर्णिमा । File Photo

वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य मिळो तुला

पुढले सातही जन्म तुझाच सहवास मिळो मला

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

वटपौर्णिमा । File Photo

लग्नाच्या पवित्र बंधात बांधली गेली तुमची साताजन्माची गाठ

अधीच आनंदात राहो तुमची सुख-दु:खात  कायम साथ

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

वटपौर्णिमा । File Photo

सर्व सवाष्ण महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

सावित्रीने मोठ्या चातुर्याने सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते. त्यामुळे आजच्या स्त्रियांमध्येही या वट सावित्रीच्या व्रताच्या निमित्ताने आपल्या कुटुंबासाठी कठीण प्रसंगातही अनुकूल परिस्थितीवर मात करून मार्ग काढण्याची शक्ती मिळो. ही प्रार्थना करत लेटेस्टली मराठी कडून सार्‍यांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा.