Vat Purnima 2021 Marathi Messages: ज्येष्ठ पौर्णिमेला 'वटपौर्णिमा' साजरी केली जाते. खरंतर हे त्रिरात्री व्रत आहे. शुद्ध त्रयोदशीपासून याची सुरुवात होते. मात्र तीन दिवस उपवास करणे शक्य नसेल तर स्त्रिया पौर्णिमेच्या दिवशी उपवास करतात. पतीला दिर्घायु्ष्य लाभावे आणि जन्मोजन्मी हाच पती लाभावा, यासाठी हे व्रत केले जाते. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात. वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून सात फेऱ्या मारतात. वडाच्या पानात फळाने सजवलेले वाण प्रथम वडाला वाहतात. नंतर पतीला देऊन नमस्कार करतात. त्यानंतर सौभाग्यवती एकमेंकींना हे वाण देतात. पूर्वीच्या काळी सर्व स्त्रिया एकत्र जमून वटवृक्षाची पूजा करत असतं. शहरीकरणानंतर वटाची फांदी घरोघरी पूजली जावू लागली. मात्र अजूनही काही ठिकाणी वडाभोवती एकत्र जमून पूजा केली जाते. सध्याच्या कोविड-19 संकटात एकत्र जमणे, गर्दी करणे टाळायला हवे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही घराच्या घरी वडाची पूजा करण्याकडे अनेकींचा कल असेल.
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Quotes सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वर शेअर करुन पतीराजांचा दिवस खास करा. त्याचबरोबर तुम्ही हे शुभेच्छा संदेश तुमच्या नातेवाईक, मैत्रिणींमध्येही शेअर करु शकता. (Vat Purnima 2021 Wishes in Marathi: वटपौर्णिमेच्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes, Messages द्वारा शेअर करत खास करा तुमच्या साथीदाराचा दिवस)
वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश!
सप्तपदींच्या सात फेर्यांनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मोजन्मी राहो असेच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर या संसाराला,
दरवर्षी अशीच येवो ही वटपौर्णिमेची घडी कायम
वटपौर्णिमेच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!
दोन क्षणाचे भांडण
सात जन्माचे बंधन
लाभून तुमची साथ झाले मी पावन
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
सावित्रीच्या निष्ठेचं दर्पण
बांधुनी जन्मोजन्मीचे बंधन
करते सातजन्माचे समर्पण
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
या शुभदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जन्मोजन्मी असाच तुमचा सहवास लाभो मला
वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
वटपौर्णिमेच्या व्रतामागे सावित्री-सत्यवान यांच्या प्रेमाची, निष्ठेची कथा सांगितली जाते. परंतु, वटपौर्णिमेच्या पुजेमागे काही शास्त्रीय कारणं देखील आहेत. वाण देण्यात ‘गिविंग ऑफ हॅप्पीनेस’ आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्याचा संदेश आहे. त्यामुळे याची जाणीव ठेवून केलेली वटपौर्णिमा अधिक लाभदायी ठरेल. विशेष म्हणजे वटाच्या फांद्या न तोडता पूजा करण्याचा संकल्प यंदाच्या वटपौर्णिमेनिमित्त करुया.