Shivrajyabhishek Sohala 2020 | Photo Credits: Twitter)

Shivrajyabhishek Sohala 2020: आज 6 जून म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक दिन (Rajyabhishek Din). आज रायगडावर शिवाजी महाराजांचा 347 वा राज्याभिषेक सोहळा पार पडला. दरवर्षी 6 जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवभक्तांची मोठी गर्दी जमते. शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Sohala) अगदी जल्लोषात साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे रायगडावर जावून शिवराज्याभिषेकाचा आनंद शिवभक्तांना अनुभवता आला नाही. तसंच घरी राहूनच शिवराज्याभिषेक दिन साजरा करा असं आवाहन खासदार संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी ट्विटच्या माध्यमातून केले होते.

कोरोना व्हायरस संकटामुळे शिवभक्तांना रायगडावर जावून शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवता आला नसला तरी नाराज होण्याचे कारण नाही. कारण 6 जून 2020 रोजी रायगडावर पार पडलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे खास फोटोज समोर आले आहेत. या फोटोजच्या माध्यमातून शिवभक्तांना शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आनंद घेता येईल. (Raigad Shivrajyabhishek Sohala 2020: रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात; Live Streaming च्या माध्यमातून पुन्हा अनुभवा गतवर्षीचा उत्साह,Watch Video)

पहा फोटोज:

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला सकाळपासूनच सुरुवात झाली होती. मात्र यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे शिवभक्तांना रायगडावर जाऊन सोहळा अनुभवता आला नाही. त्यामुळे शिवभक्तांसाठी गतवर्षीचा सोहळा लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून अनुभवण्याची सोय करण्यात आली होती. तसंच या वर्षीच्या सोहळ्याचा व्हिडिओ लवकरच शिवभक्तांच्या भेटीला येणार आहे.