Ratha Saptami 2020: रथ सप्तमीचे व्रत कोणी करावे? जाणून महत्व

वैदिक धर्मानुसार प्रत्येक वर्षाच्या माघ महिन्यातील शुक्लपक्ष सप्तमीला रथ सप्तमी असे म्हटले जाते. देशाच्या विविध ठिकाणी या सप्तमीला 'अचला सप्तमी' किंवा 'आरोग्य सप्तमी' नावाने सुद्धा ओळखले जाते. असे मानले जाते की, या दिवशी साक्षात देव भगवान भास्कर यांनी केलेल्या पूर्ण विधीनुसार पूजेमुळे प्रसन्न होऊन सुख, शांति आणि आरोग्य उत्तम राहिल असा आशीर्वाद दिला होता.

Ratha Saptami 2020: रथ सप्तमीचे व्रत कोणी करावे? जाणून महत्व
Ratha Saptami (Photo Credits: Twitter)

Ratha Saptami 2020: वैदिक धर्मानुसार प्रत्येक वर्षाच्या माघ महिन्यातील शुक्लपक्ष सप्तमीला 'रथ सप्तमी' असे म्हटले जाते. देशाच्या विविध ठिकाणी ही सप्तमी 'अचला सप्तमी' किंवा 'आरोग्य सप्तमी' नावाने सुद्धा ओळखली जाते. असे मानले जाते की, या दिवशी साक्षात देव भगवान भास्कर यांनी केलेल्या पूर्ण विधीनुसार पूजेमुळे प्रसन्न होऊन सुख, शांति आणि आरोग्य उत्तम राहिल असा आशीर्वाद दिला होता. वैज्ञानिकांच्या मते सूर्याच्या किरणामुळे विटामिन डी जीवनसत्व आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. येत्या 1 फेब्रुवारीला सर्वत्र रथ सप्तमीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

रथ सप्तमी हा स्त्रिया संक्रांतीनिमित्त करत असलेल्या हळदी-कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो. हिंदू धर्मीयांच्या मते रथ सप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. अदिती आणि कश्यप यांचा पुत्र 'सूर्य' याचा हा जन्मदिवस आहे, असे मानले जाते. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. तर जाणून घ्या रथ सप्तमीचे व्रत कोणी करावे आणि त्याचे महत्व काय आहे.(Ratha Saptami 2020: यंदा 1 फेब्रुवारीला साजरी होणार 'रथ सप्तमी'; जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त, धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व)

-ज्या व्यक्तींच्या राशींमध्ये सूर्य खालील बाजूस असल्यास त्यांनी व्रत करावे.

-आरोग्यासंबंधित वारंवार समस्या येत असल्यास

-ज्या व्यक्तींना शिक्षाणामध्ये अडथळा येत असेल तर त्यांनी प्रगती करण्यासाठी हे व्रत करावे

-मुल होण्यास अडथळा येत असल्यास

रथ सप्तमीला ज्याप्रमाणे धार्मिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे वैज्ञानिक महत्तवही आहे. या दिवशी सूर्याची किरणे अंगावर पडल्याने आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. सूर्याच्या किरणांमुळे शारिरिक दुर्बलता, हाडांचा कमकुवतपणा, सांधे दुखी, त्वचेचे विकार दूर होतात.रथ सप्तमीच्या दिवशी तुळशीपुढे सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सुर्यरथाचे चित्र काढून स्त्रिया त्याची पूजा करतात. तसेच अंगणात अग्नी पेटवून भात शिजवून सूर्य देवास नैवेद्य दाखविला जातो. या दिवशी 'ॐ घृणि सूर्याय नम:' असा जप केल्यास सूर्यदेवता प्रसन्न होते, असेही म्हटले जाते.

(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2020 04:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).