Putrada Ekadashi 2025 Wishes In Marathi: एकादशी व्रत हे सर्व व्रतांपैकी श्रेष्ठ मानले जाते आणि प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी असतात, ज्या भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असतात. वर्षातील सर्व एकादशी तिथींमध्ये पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपौष पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते. यावर्षी पौष पुत्रदा एकादशी 10 जानेवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. असे मानले जाते की, या दिवशी उपवास करून, भगवान विष्णूची पूजा केल्याने निःसंतान जोडप्यांना संतान सुख प्राप्त होते. यामुळे त्यांना जीवनातील सर्व सुख मिळतात. हे व्रत प्रामुख्याने अपत्य प्राप्तीच्या इच्छेने केले जाते. एवढेच नव्हे तर या एकादशी व्रताची कथा वाचून किंवा ऐकून पुण्यफळ प्राप्त होते. पौष पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने अग्निष्टो यज्ञाचे फळ मिळते. अपत्य प्राप्तीच्या इच्छेने केलेले हे महान व्रत आहे. हे व्रत केल्याने नि:संतान दाम्पत्यांना निरोगी आणि दीर्घायुषी पुत्र प्राप्त होतो. पौष पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने आपण आपल्या प्रियजनांना मराठीतून या शुभेच्छा, व्हॉट्सअ ॅप , कोट्स आणि फेसबुक शुभेच्छा पाठवू शकता.
पुत्रदा एकादशीनिमित्त पाठवता येतील असे खास शुभेच्छा संदेश
विठू माऊलीची कृपा
आपणा सर्वांवर कायम अशी राहो…
पुत्रदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
विठ्ठल माझा ध्यास,
विठ्ठल माझा श्वास,
विठ्ठल माझा भास,
विठ्ठल माझा आभास
पुत्रदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
जय श्री लक्ष्मी नारायण नमः
पुत्रदा एकादशीच्या शुभ मुहूर्तावर
भगवान विष्णू तुमच्या मुलांना
सुख, शांती, समृद्धी देवो.
पुत्रदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
ओम लक्ष्मी नारायण नमो नम:
तुम्हाला संतती आणि संपत्तीचे सुख मिळो.
पुत्रदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
पुत्रदा एकादशीचे व्रत श्रद्धेने केल्यास
भगवान श्री हरींची कृपा राहते व
सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात.
पुत्रदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
पौष पुत्रदा एकादशीशी संबंधित आख्यायिकेनुसार एकेकाळी भद्रावती नगरीत सुकेतू नावाचा राजा पत्नी शैव्यासोबत राहत होता. लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही त्यांना अपत्य झाले नाही, त्यामुळे दोघेही खूप दु:खी होते. एके दिवशी राजा-राणी मंत्र्याकडे राजेपद सोपवून जंगलात गेले, अपत्य नसल्याच्या दु:खामुळे दोघांनीही आत्महत्येचा विचार केला, पण मग त्यांच्या लक्षात आले की आत्महत्येपेक्षा मोठे पाप नाही. त्याच वेळी त्याला वेदपठणाचा आवाज ऐकू आला आणि तो आवाज ऐकून तो त्याच दिशेने निघाला. वेदपठण करणारे या संतांकडे गेल्यावर त्यांनी आपली सर्व व्यथा सांगितली, त्यानंतर साधूंनी त्यांना पौष पुत्रदा एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. यानंतर राजा आणि राणीने पूर्ण भक्तीभावाने आणि राज्याने हे व्रत पाळले. या व्रताच्या प्रभावाने त्यांना अपत्यप्राप्ती झाली, त्यामुळे नि:संतान दाम्पत्यांसाठी हे व्रत उत्तम मानले जाते.