Thane Dahi Handi 2019:   जय जवान पथकाची  9 थरांची सलामी; यंदा 10 मानवी थर रचून विश्वविक्रमाचा  मानस
Jai Jawan Govinda Pathak (Photo Credits-Facebook)

आज देशभरात गोकुळाष्टमीच्या (Golkulashtami) निमित्ताने दही हंडीचा उत्सव सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. तर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई मधील दही हंडीचा उत्सव हा पाहण्यासारखा असून या ठिकाणी काही मानाच्या हंड्या फोडल्या जातात. त्यामुळे विविध गोविंदापथकांची गेल्या दोन महिन्यांची कसरत दही हंडी फोडताना दिसून येते. मात्र मुंबई मधील जय जवान हे गोविंदा पथक प्रत्येक वर्षी दहीहंडी फोडताना त्यांचा विश्वविक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात.

यंदा ठाणे मधील नौपाडा येथे मनसेने केलेल्या दही हंडीत जय जवान गोविंदा पथकाने 10 थर लावण्याचा प्रयत्न केला. मात्र 9 थरच त्यांना लावता आले. तरीही जय जवान यांनी विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे. तसेच संस्कृती प्रतिष्ठान यांच्या दही हंडीत जय जवान येथे सुद्धा त्यांनी 9 लावताना दिसून आले.(Dahi Handi 2019: जगातील सर्वात उंच दहीहंडीचा जागतिक विक्रम आहे मुंबईच्या 'या' पथकाच्या नावे; स्पेन आणि चीनलाही टाकले मागे)

तसेच मुंबई मधील आयडियच्या गल्लीमधील दही हंडी दरवर्षीप्रमाणे महिलांच्या गोविंदापथकाने फोडली. त्याचसोबत प्लाजा सिनेमागृहाजवळील महाराष्ट्रातमधील सर्वात प्रथम गोविंदा पथकामध्ये यंदा अंध-दिव्यांग सुद्धा हंडी फोडण्यासाठी पुढे आले होते. मुंबईमधील सर्वात जुना ताडवाडी गोविंदा पथकाला या वर्षी 47 वर्ष पूर्ण झाले आहेत. तर दादर, लालबाग, वरळी, नवी मुंबई आणि ठाणे येथील दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटत विविध गोविंदा पथकांनी 8 थरांची सलामी देण्याचा प्रयत्न केला.