Mumbai Cha Raja (Photo Credits: Instagram/ Mumbai Cha Raja)

Mumbai Cha Raja 2019 Aagaman Sohala and Pratham Darshan:  मुंबईचा राजा (Mumbai Cha Raja) म्हणून ओळख असलेला लालबाग भागातील गणेश गल्ली गणपती (Ganesh Galli Ganpati) यंदा 92 वे वर्ष साजरे करत आहे. आज (30 ऑगस्ट) दिवशी या मंडळातील गणेशमूर्तीचं आगमन होणार आहे. दक्षिण मुंबईतील लालबाग परिसर सध्या गणेश मूर्तींच्या आगमन सोहळयाने दुमदुमत आहे. या भागातील बाजारपेठांमध्येही गणेश चतुर्थीच्या आगमन सोहळ्यासाठी तयारी सुरू आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली गणेश चतुर्थी सेलिब्रेशनमध्ये तुम्हीही सहभागी होणार असाल तर पहा आज गणेश गल्लीचा गणपती म्हणजेच मुंबईचा राजा कोणत्या मार्गावरून मंडळात पोहचणार आहे. तसेच हा सोहळा किती वाजता रंगेल?

मुंबईचा राजा गणेश गल्ली आगमन सोहळा

मुंबईत आज गणेश गल्ली गणपतीची मिरवणूक लालबाग, परेल भागातील हनुमान मंदिर, डॉ. एस एस राव मार्ग, जी जी भाई मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग यावरून गणेश गल्लीकडे जाणार आहे. हा आगमन सोहळा मुंबईमध्ये आज सायंकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणार आहे.

गणेश गल्ली गणपती प्रथम दर्शन

गणेश गल्ली गणपतीचं प्रथम दर्शन 31 ऑगस्ट दिवशी संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. त्यामुळे मंडपात दर्शन घेण्यापूर्वी यंदा टेलिव्हिजन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून गणेशगल्ली गणपतीची पहिली झलक त्याच्या भक्तांना पाहता येईल.

गणेश गल्लीच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर 2 ते 12 सप्टेंबर दरम्यान हा मुंबईचा राजा भाविकांना दर्शन देण्यासाठी सज्ज होणार आहे. यंदा अयोद्धेतील राम मंदीराच्या प्रतिकृतीवर या मंडळाची सजावट करण्यात आली आहे. 12 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी दिवशी या गणपतीचं विसर्जन होणार आहे.