Rangoli Designs (PC - You Tube)

Maha Shivratri 2025 Easy Rangoli Ideas:  महाशिवरात्रीचा सण हा प्रत्येक शिवभक्तासाठी खूप खास असतो. या दिवशी लोक भगवान शंकराची पूजा करतात. यासोबतच ते आपल्या घरांची साफसफाई आणि सजावटही करतात. घरोघरी वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. शिवाय घरसजवण्यासाठी दारासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात.  रांगोळीमुळे सौंदर्य तर वाढतेच पण नकारात्मक ऊर्जाही दूर होते. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ प्रसंगी दारासमोर रांगोळी काढण्याची पद्धत आहे. यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारी रोजी असून या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता.  त्यामुळे तुम्हालाही आपल्या घरी रांगोळी बनवायची असेल तर तुम्ही अनेक ट्रेंडी डिझाइन्स सहज तयार करू शकता. खाली नवीनतम रांगोळी डिझाइनचे ट्यूटोरियल व्हिडिओ आहेत जे तुम्ही झटपट काढू शकता.

येथे पाहा, महाशिवरात्रीनिमित्त काढता येतील असे हटके रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ:

भगवान शिवाच्या विविध रूपांसह शिवलिंगाची सोपी रांगोळी तयार करून तुम्ही तुमच्या घराचे सौंदर्य वाढवू शकता.  मग तुम्ही कशाची वाट पाहत आहात? महाशिवरात्रीच्या सणानिमित्त रांगोळी तयार करण्यासाठी आमच्या सुचवलेल्या सर्व व्हिडिओ पहा आणि दारासमोर सुंदर रांगोळी काढून सणाचा आनंद आणखी द्विगुणीत करा.