Hariyali Teej 2024: हरियाली तीज हा धार्मिक सण दरवर्षी श्रावण शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. सनातन धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया सौभाग्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात आणि अविवाहित मुली त्यांच्या इच्छित वरासाठी भगवान शंकराची पूजा करतात. यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा तसेच सुख, शांती आणि समृद्धी येते. यावर्षी हा सण 7 ऑगस्ट 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी महिला शृंगार करतात, हिरव्या काचेच्या बांगड्या घालून पूजा करतात आणि एकमेकांना हरियाली तीजच्या शुभेच्छा देतात. हे देखील वाचा: Jaya Bachchan And Jagdeep Dhankhar Over Amitabh: महिलांना पतीच्या नावानेच का ओळखले जावे? जया बच्चन यांचा जगदीप धनखड यांच्याबोत शाब्दिक खटका (Watch Video)
हरियाली तीजला शुभ मुहूर्त
यंदा हरियाली तीजला अतिशय लाभदायक शिवयोग तयार होत आहे विविध पंचांगानुसार, यावर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ६ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ७.४२ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी ७ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री १०.०५ वाजता समाप्त होईल.
उदय तिथीच्या नियमांनुसार, हरियाली तीजचे व्रत आणि पूजा 7 ऑगस्ट 2024 रोजी पूर्ण होईल, आणि या वर्षी हरियाली तीजला शिवयोग देखील तयार होत आहे, जो लोकांसाठी खूप शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण ज्योतिषी मानतात की, शिवयोग हा भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्यासाठी सर्वात फायदेशीर योग आहे. या दिवशी व्रत आणि भगवान शंकराची पूजा केल्याने पूर्ण फळ मिळते.
शिवयोग मुहूर्त, जाणून घ्या