Happy New Year 2020 Wishes HD Images (Photo Credits: File Image)

Happy New Year 2020 Marathi Messages: 2019 वर्षातील गोड आठवणींना मनात ठेवून आणि कटू आठवणींना मागे ठेवून नवीन वर्षाची गोड सुरुवात करणे हाच प्रत्येकाचा नवीन वर्षाचा पहिला संकल्प असतो असं म्हणायला हरकत नाही. नवीन वर्ष आपल्या मध्ये नवा उत्साह, नवी चेतना निर्माण करते. त्यामुळे या नववर्षाच्या पहिल्या दिवसाचे महत्व देखील तितकेच खास आहेत. यात काही लोक नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवाचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची मंगलमयी सुरुवात करतात तर काही आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवतात. यामागचा उद्देश एकच असतो की नवीन वर्षाची सुरुवात चांगली आणि उत्साहपूर्ण व्हावी.

अशा चैतन्यमयी वातावरणात नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळ्या ग्रीटिंग्स

नववर्षाच्या पहाटेसह तुमचे आयुष्य होवो प्रकाशमान

तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबाला नववर्षाच्या शुभेच्छा छान

हॅप्पी न्यू ईयर

Happy New Year Messages 2020 (Photo Credits: File)

चला नवीन वर्षाचे स्वागत करुया

जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवूया

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy New Year Messages 2020 (Photo Credits: File)

गेलं ते वर्ष, सरला तो काल,

नवीन आशा अपेक्षा घेऊन आले 2020 हे साल

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy New Year Messages 2020 (Photo Credits: File)

हेदेखील वाचा- Happy New Year 2020 Wishes: नववर्षाच्या मराठमोळ्या शुभेच्छा messages, Whatsapp Status, Images च्या माध्यमातून देऊन करा नव्या वर्षाची चैतन्यमयी सुरुवात

येवो सुख, समृद्धी तुमच्या अंगणी

वाढो आनंद तुमच्या जीवनी

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy New Year Messages 2020 (Photo Credits: File)

2020 हे वर्ष तुमच्या आयुष्यात

सुख, समाधान आणि भरभराट घेऊन येवो

हिच आमची सदिच्छा

हॅप्पी न्यू ईयर

Happy New Year Messages 2020 (Photo Credits: File)

शुभेच्छांच्या माध्यमातून आपले एकमेकांविषयी असलेली प्रेम आणि त्यांची आठवण सांगणं हाच मुख्य उद्देश असतो. त्यामुळे अत्यंत उत्साहात आणि चैतन्यपूर्ण वातावरणात नववर्षाचे स्वागत करा हिच सदिच्छा