Representative Image (Photo Credits: YouTube)

Gandhi Jayanti 2022 Fancy Dress Competition Ideas: ‘राष्ट्रपिता’ मोहनदास करमचंद गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २ ऑक्टोबरला गांधी जयंती साजरी केली जाते. महात्मा गांधींनी ब्रिटिश वसाहतीच्या विरोधात भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध लढण्याच्या त्यांच्या अहिंसक मार्गाने जगभरातील अनेकांना प्रेरणा दिली. त्यामुळे हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणूनही साजरा केला जातो. भारत महात्मा गांधीचे स्मरण करून आणि अहिंसा, शांतता आणि समाजकल्याणाच्या त्यांच्या आदर्शांचा प्रसार करण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून वार्षिक उत्सव साजरा करतो. शाळा आणि इतर शैक्षणिक संस्था महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध  कार्यक्रमाचे आयोजन करतात. इतर उपक्रमांपैकी, फॅन्सी ड्रेस स्पर्धा ही दरवर्षी गांधी जयंतीला आयोजित करणाऱ्या बहुतांश शाळांमध्ये सामान्य आहे. म्हणून, जर तुम्ही या वर्षी तुमच्या मुलाला महात्मा गांधी यांच्या सारखी वेषभूषा करायची असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. तुमच्या मुलाला फॅन्सी ड्रेससाठी   बापू सारखे सजवण्यासाठी छान कल्पना घेऊन आलो आहोत, पाहा व्हिडिओ ट्युटोरियल,  त्या दिवशी तुमच्या मुलाने फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घ्यावा असे तुम्हाला वाटत असल्यास, महात्मा गांधी यांचा पोशाख तयार करण्यासाठी सर्व साहित्य पूर्वीपासून तयार करून ठेवा. काचेच्या गोल चष्म्यांपासून ते पांढऱ्या सुती धोतरापर्यंत, तुमच्या मुलाला बापूसारखे सजवण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट व्हिडीओमध्ये आहे. गांधी जयंती 2022 फॅन्सी ड्रेस स्पर्धा कल्पनांसाठी या ट्युटोरियल व्हिडिओंमधून प्रेरणा घ्या. खाली स्क्रोल करा आणि अधिक जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ

 फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी ट्युटोरियल व्हिडिओ, पाहा 

 फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी ट्युटोरियल व्हिडिओ, पाहा 

 फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी ट्युटोरियल व्हिडिओ, पाहा 

 फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी ट्युटोरियल व्हिडिओ, पाहा 

गांधी जयंती 2022 रविवारी येत असल्यामुळे, फॅन्सी ड्रेस स्पर्धा अगोदर आयोजित केली जाऊ शकते! म्हणून, आपल्या मुलास महात्मा गांधी सारखे सजवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीची आपण पूर्व तयारी केल्याचे सुनिश्चित करा. शक्य तितक्या लवकर पूर्व तयारी करून शेवटच्या क्षणी होणारा त्रास टाळा