Basava Jayanti 2024 Wishes: 10 मे 2024 ला हिंदू धर्माचे लोक अक्षय्य तृतीया, परशुराम जयंती आणि बसव जयंती साजरी करत आहेत. बसव जयंती बद्दल बोलायचे तर हा वीरशैव लिंगायत हिंदूंचा सर्वात महत्वाचा सण मानला जातो. लिंगायत धर्माचे प्रचारक भगवान बसव यांची जयंती कर्नाटकात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यानिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, कर्नाटकात बसव जयंती म्हणजेच भगवान बसवण्णांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देवून या सणाच्या शुभेच्छा देतात. बसव जयंती हा लिंगायत बहुसंख्य कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये बसवण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जाणारा हिंदू सण आहे. प्रभू बसवण्णा हे लिंगायत धर्माचे संस्थापक होते आणि त्यांचा जन्मदिवस हा बसवण्णा युग किंवा बसवेश्वर युग या नवीन युगाची सुरुवात मानला जातो. बसवेश्वरांचा जन्मदिवस सहसा वैशाख महिन्याच्या तिसऱ्या दिवशी येतो. बसव जयंतीच्या या शुभ प्रसंगी तुम्ही तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा, व्हॉट्सॲप मेसेज, एचडी इमेजेस, कोट्स आणि फेसबुक शुभेच्छा पाठवून शुभेच्छा देऊ शकता.
पाहा खास शुभेच्छा संदेश
कर्नाटकात ही सुट्टी म्हणून घोषित करण्यात आली आहे. कारण कर्नाटकात बसवण्णांचे अनुयायी मोठ्या संख्येने आहेत. कर्नाटकातील सर्व शहरे आणि खेड्यातील लोक मोठ्या थाटात साजरा करतात. या दिवशी लोक बसवेश्वराच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करतात. शेतकऱ्यांसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे.