Ashadhi Ekadashi Social Media Wishes: आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) म्हटलं की, डोळ्यासमोर येते ते पंढरपूर (Pandharpur). चंद्रभागेच्या वाळवंटी जमलेला वैष्णवांचा मेळा. सावळ्या विठ्ठल-रखुमाई दर्शनासाठी महाराष्ट्र, भारत आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून येणारे वारकरी. पंढरपूरमध्ये आषाढी निमित्त वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव भरतो. ज्याला महाराष्ट्र, भारत आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक हजेरी लावतात. म्हणूनच हिंदू पंचागामध्ये आषाढी एकादशीला अधिक महत्त्व पाहायला मिळते. या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणूनही ओळखले जाते. जी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येते. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी भाविकांमध्ये भावना पाहायला मिळते. या दिवसाला धार्मिक दृष्टीकोणातूनही पाहिले जाते. आषाढी वारीनिमित्त तुम्ही पांडूरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरला जाऊ शकला नाही तरी, घरबसल्या एकमेकांना शुभेच्छा तर नक्की देऊ शकता. आपण सोशल मीडियाच्या WhatsApp, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवरुन शुभेच्छा संदेश, Messages, Wishes पाठवून तुम्ही आषाढी एकादशीचा उत्साह कायम राखू शकता.
हिंदु पंचागानुसार पाहायचे तर प्रत्येक महिन्याचे दोन भाग होतात. जे पंधरवड्यात विभागले जातात. महिन्यात दोन पंधरावडे येतात त्यामुळे तिथ्याही दोन येतात. एक शुद्ध आणि दुसरी वद्य. त्यामुळेच आषाढ महिन्यामध्ये तिथी दोन वेळा आल्याचे पाहायला मिळते. ज्याला आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाडी वद्य एकादशी म्हणून ओळखले जाते.
या महिन्यातील (आषाढ) शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणून ओळखले जाते. तर वद्य एकादशी कामिका एकादशी म्हणूनही ओळखली जाते.
यंदाच्या वर्षी आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात म्हणजेच इंग्रजी कॅलेंडरनुसार सांगायचे तर 29 जून रोजी येत आहे. पहाटे 3.18 मिनीटांनी सुरु झालेली ही एकादशी 30 जून रोजी दुपारी 4.42 वाजता समाप्त होणार आहे.
भारतीय पंचांगात सूर्योदयाची तिथी मानली जाते. प्राचीन काळापासून अशाच प्रकारे तिथी मानली जाते. त्यामुले आषाडी एकादशी गुरुवार दिनांक 29 जून 2023 रोजी साजरी होईल.
आषाढी एकादशी पूर्वीच्या काळी वारकरी सांप्रदाय आणि विठ्ठल भक्तांसाठी पर्वणी असायची. आज त्याचे राजकारणी मंडळींनाही मोठे आकर्षण वाटते. त्यामुळे राजकारणी मंडळींच्या फेऱ्याही आषाढ महिन्यात पंढरपूरला वाढतात.
मधल्या काही काळात आषाढी एकादशीवरुन राजकारणही मोठ्या प्रमाणावर तापले आहे. परंपरेणे चालत आलेल्या या उत्सवातील गर्दीत नेते मंडळी आपला राजकीय अवकाश शोधतात. परिणामी भक्तीरसात तल्लीन असलेला वारकऱ्याला नाईलाजास्तव राजकीय लोकांना महत्त्व द्यावे लागते.