(Photo: Maharaja Bhog)

पार्टीसाठी बाहेर भेटायचं म्हटलं अाणि त्यामध्येही तुमचे फ्रेंड्स शाकाहरी असले म्हणजे काय आणि कुठे खायचं हा प्रश्न येतोच.  भारतामध्ये खाद्यसंस्कृतीही विविधतेने नटली आहे. मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये देशभरातील चविष्ट पदार्थांची चव काही हॉटेल्समध्ये चाखता येते. 

उपवासाच्या आणि चातुर्मासाच्या काळात जर तुम्हांला मांसाहार करणं निषिद्ध असेल तर अशाकाळात चटकदार काय खावे या प्रश्न पडणाऱ्यांसाठी या हॉटेलमधील खवय्येगिरी फायद्याची ठरणार आहे. नेहमी पेक्षा थोड्या हटके चवीची तुम्हांला लज्जत लुटायची असेल तर हॉटेल्सला नक्की भेट भेट द्या.  

महाराजा भोग

मुंबईत तुम्हांला चविष्ट शाकाहारी गुजराती किंवा राजस्थानी थाळीचा आनंद घ्यायचा असेल तर महाराजा भोगला नक्की भेट द्या. या . हॉटेलात तुम्हाला तांब्याच्या भल्या मोठ्या थाळीत . जेवण वाढलं जातं . यामध्ये मर्यादीत स्वरूपात किमान ३० पदार्थांचा समावेश असतो. या हॉटेलमध्ये नेहमी मेन्यू बदलत राहतो. किमान महिन्याभराने मेन्यू रिपीट होतो. २-३ स्टार्टर्स, ३-४ वेग वेगळ्या पद्धतीच्या भाज्या, आंबट तिखट डाळ, कढी असे विविध पर्याय . उपलब्ध असतात. सोबतीला गोडाचे पदार्थ असतात. त्यामुळे रिकामं पोट ठेवून आणि काही वेळ डाएटचं गणित बाजूला सारून महाराजा भोगला भेट द्या.

कुठे चाखाल चव   - लोअर परेल, जुहू, गोरेगाव, मलाड  

दिल्ली हायवे

मुंबईत राहून दिल्लीतील पदार्थांची चव चाखायची असेल तर दिल्ली हायवे हा उत्तम पर्याय आहे. उत्तर भारतातील अनेक शाकाहारी पदार्थांचा येथे अमर्यादीत  प्रमाणात आस्वाद घेता येतो. पराठे , पुरी, कुलचा, छोले भटुरे अशा पदार्थांचा इथे आस्वाद घेता येतो. केवळ चाटचे . पदार्थ नव्हे तर . लस्सी, जिलेबी राबडी, फिरनी,  मूग डाळीचा हलवा येथे उत्तम मिळतो.

कुठे चाखाल चव   - साकीनाका

हॉटेल रामानायक

मुंबईत काही भागात अस्सल दक्षिण भारतातील खाद्य पदार्थ मिळतात त्यापैकी एक म्हणजे माटुंगा. माटूंग्यातील रामानायक हॉटेलमध्ये चविष्ट साऊथ इंडियन पदार्थ चाखता येते. त्यामध्ये डोसा, रसम, भात, शिरा, पायसम ते अगदी फिल्टर कॉफी देखील पारंपरिक पद्धतीने दिली जाते. जेवण या हॉटेलात केळीच्या पानावर वाढण्याची पद्धत आहे.  माफक दारात केळीच्या पानावर तुम्ही अमर्यादीत जेवू शकता. मात्र अन्न टाकून देण्यास येथे मनाई आहे.

कुठे चाखाल चव   - माटुंगा पूर्व

शिव सागर

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत शिव सागर हे फास्ट फूड साठी लोकप्रिय आहे.  साऊथ इंडियन, पंजाबी, चायनीज, इटालियन, मेक्सिकन पदार्थांची चव येथे चाखलायच हवी. शिव सागरची पावभाजी खूपच लोकप्रिय आहे. तुम्ही विकेंड ला परिवारासोबत मुंबई फिरायला बाहेर पडलात तर शिवसागरला नक्की भेट द्या. या ठिकाणी आईस्क्रीम, कुल्फी, फालुदा देखील चाखा. गिरगावला समुद्राचा आनंद लुटायला गेलात तर तिथे जवळच शिवसागर आहे.

कुठे चाखाल चव   - मुंबईत अनेक ठिकाणी  शिव सागर आहे.

बर्मा बर्मा

भारतीय खाद्य संस्कृती प्रमाणेच काही परदेशी अस्सल शाकाहारी पदार्थांची चवही उ त्तम आहे. यामध्ये तुम्ही काही आशियन आणि बर्मी पदार्थांचा आनंद घेऊ शकता. या रेस्ट्रॉरंटचा लूक म्यानमार (रंगून) प्रमाणे ठेवण्यात आला आहे. येथे फालुदा, सामोसा सूप, नूडल्स, सलाड, यांचा आनंद घेऊ शकता .

कुठे चाखाल चव   - कोठारी हाउस, अलाना सेंटर लेन, एमजी रोड, फोर्ट