Ram Temple Premises Looks During Night: अयोध्येत भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराचे येत्या २२ जानेवारीला उद्धाटन होणार आहे. दरम्यान, राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रात्रीच्या वेळी राम मंदिर परिसराची छायाचित्रे शेअर केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी रोजी स्वत: राम लाल्लाच्या नवीन मूर्तीचे अभिषेक करणार आहेत. सध्या या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. अयोध्या नगरी रामभक्तीत पूर्णपणे डुंबलेली दिसत आहे. सर्वत्र सजावट केली जात आहे. अयोध्येत आजपासून रामकथा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मालिका सुरू होत आहे. सध्या गर्भगृहात फिनिशिंगचे काम सुरू आहे. (हेही वाचा - Live Telecast Of Consecration In Ram Temple: राममंदिराचा जल्लोष परदेशातही पाहायला मिळणार; टाइम्स स्क्वेअरवर होणार राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणेचे थेट प्रक्षेपण)
Ram Janmbhoomi Teerth Kshetra Trust shares pictures of Ram Temple premises as it looks during the night. pic.twitter.com/2RPXVUBebA
— ANI (@ANI) January 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)