Saamana Article on Bhagat Singh Koshyari : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा राजभवन परिसरातील पेढ्यांची दुकाने बंद पडली असावीत, सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांवर खोचक टीका
Sanjay Raut (Pic Credit - ANI)

राज्याच्या नवनिर्वाचीत सरकारच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड झाली. संबंधी सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर हल्लाबोल करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना विधानसभा अध्यक्षपदाची निवड 'हेड काऊंट' पद्धतीने घेण्याची परवानगी नव्हती.त्यावेळी गुप्त मतदान अनिवार्य होते. मग आता हेड काऊंट पध्दत वापरण्याच्या मागचे कारण काय असा थेट सवाल राज्यपाल (Governer) भगतसिंह कोश्यारींना (Bhagat Singh Koshyari) सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

महाराष्ट्रातले ठाकरे सरकार गेल्याचा जास्त आनंद राज्याच्या राज्यपालांना झाल्याचं दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद क्रांतिवीर भगतसिंगास लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात ब्रिटिशांनी फाशी दिली त्यावेळी ब्रिटिशांना आनंद झाला असेल तसा आनंद राज्यपालांना झाला असेल.तसेच नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) राज्यपालांनी पेढा भरवून आनंद व्यक्त केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना हा आनंद झाला नव्हता. बहुधा राजभवन परिसरातील पेढ्यांची दुकाने बंद पडली असावीत, अशी खोचक टीका करत सामनातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर करण्यात आली आहे.  (हे ही वाचा:- एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का)

कानटोप्या घालाव्यात तसे भगवे फेटे घालून 'मावळे' होता येत नाही. काल विधानसभेचा अध्यक्ष निवडल गेला पण ही निवड बेकायदेशीर आहे आणि यात राज्यपाला सहभागी आहेत. तसेच  राज्यपालांच्या हातातील संविधानाचे पुस्तक नक्की कोणाचे? डॉ. आंबेडकरांचे की अन्य कोणाचे? राज्यपालांच्या हातातील न्यायाचा तराजू हा सत्याचा की सुरतच्या बाजारातला? असा थेट सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.