सध्या राज्यात शिवसेना आणि भाजपामध्ये (Shivsena vs BJP) तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पण दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरें (Raj Thackeray) यांनी भोंग्या बाबत (Loudspeaker Controversy) घेतलेल्या मुद्याला गुजराती समाजाने जाहीर समर्थन दिले आहे. यास समर्थात त्यांनी मुंबईत (Mumbai) बॅनर्स लावले आहे. ठाण्यातील सभेतून 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यातच आता गुजराती समाजाने मुंबईत बॅनर्ल लावत राज ठाकरेंच्या भूमिकेचं जाहीर समर्थन केलं आहे.
काय आहे प्रकरण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरबाबत म्हटले आहे की, मशिदींवर लावलेले लाऊडस्पीकर 3 मे पर्यंत हटवले नाहीत तर जशास तसे उत्तर दिले जाईल. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही धमकी म्हणजे गळा घोटणारी आहे. मुंबईतील मशिदींमधले बेकायदेशीरपणे लावलेले लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी आधी भाजप नेत्यांनी केली होती, मात्र गेल्या आठवडय़ात राज ठाकरेंनी ती पूर्णपणे अंगावर घेतली आहे. (हे देखील वाचा: Mohit Kamboj: सेनेच्या कार्यकर्त्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची मोहित कंबोज यांची विनंती)
मशिदीवरील लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम देत राज ठाकरे म्हणाले की, नमाजासाठी रस्ते आणि पदपथ कशाला हवेत? तुमचा प्रार्थना तुम्ही घरी वाचा, आम्हाला का त्रास देत आहात. तसेच त्यांना आमचा मुद्दा समजला नाही तर तुमच्या मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवली जाईल. आम्ही राज्य सरकारला सांगतो की आम्ही या मुद्द्यावरून मागे हटणार नाही. तुम्हाला काय करायचे आहे ते करा. असे राज ठाकरे यांनी आपल्या सभेत सांगितले आहे.