Mahayuti | Maharashtra CM Eknath Shinde With His Deputies Devendra Fadnavis and Ajit Pawar (File Image)

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकांचे (Maharashtra Vidhan Sabha Elections) बिगूल दिवाळीनंतर वाजण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांनी दिले आहेत. नोव्हेंबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूका होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. हरियाणा, जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता सार्‍याचे लक्ष महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकांकडे लागलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमामध्ये बोलताना,"येत्या दोन महिन्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील. यावेळी एकनाथ शिंदे यांनी चांदिवली विधानसभा मतदारसंघातून दिलीप लांडे यांना निवडून द्या, असे आवाहनही केले आहे." चांदिवली मध्ये मिठी नदीच्या बाजूला आणि विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील क्रांतीनगर व संदेश नगर येथील प्रकल्प बाधित झोपडपट्टीधारकांचे एचडीएल संकुल, कुर्ला येथे बांधलेल्या इमारतीत पुनर्वसन करण्यात आले. या घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी निवडणुकांबद्दल वक्तव्य केले आहे. Mahayuti Likely to Break: शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसची अॅलर्जी, महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; अजित पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष.   

महाराष्ट्र विधानसभेची मुदत कधी संपणार?

288 जागांवर महाराष्ट्र विधानसभा निवडणूका होणार आहेत. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपणार आहे. त्यामुळे आता या आधी नवं सरकार स्थापन करण्यासाठी निवडणूका कधी होणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सध्या महायुतीच्या सरकार मध्ये  एकनाथ शिंदे  मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. 2019 मध्ये राज्यात चौदावी विधानसभा स्थापन करण्यात आली आहे.

2019 मध्ये विधानसभा निवडणूका या 21 ऑक्टोबर 2019 रोजी एकाच टप्प्यामध्ये झाल्या होत्या.  भाजपा- शिवसेनेच्या बाजूने कौल मतदारांनी दिला होता मात्र सरकार स्थापनेवरील मतभेदांनंतर, शिवसेनेने एनसीपी आणि कॉंग्रेस महाविकास आघाडी चं सरकार स्थापन केले होते. मात्र पक्षात फूट पडल्यानंतर पुन्हा  भाजप-शिवसेना राष्ट्रवादी युतीचं  नवं सरकार अस्तित्त्वात आले. त्याची धुरा एकनाथ शिंदेंच्या हातात देण्यात आली होती.

महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूकांनंतर आता विधानसभा निवडणूकीच्या तयारीसाठी सारेच राजकीय पक्ष सज्ज झाले आहे. महायुती आणि महा विकास आघाडी कडून सर्व्हे करुन आता जागावाटपाचा आढावा घेतला जात आहे.