धुळे महानगरपालिका निवडणूक 2018:  9 डिसेंबरला मतदान, भाजप विरुद्ध भाजप काट्याची टक्कर
धुळ्यात भाजप विरुद्ध भाजप संघर्ष (संग्रहित, संपादित, प्रतिकात्मक प्रतिमा)

Dhule Municipal Corporation Election 2018: अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या धुळे महानगरपालिका (Dhule Municipal Corporation) निवडणुकीसाठी उद्या म्हणजेच 9 डिसेंबर (रविवार) रोजी मतदान पार पडत आहे. आगोदरच्या प्रभाग रचनेनुसार एका प्रभागात एकूण दोन सदस्य असत. मात्र, आता प्रभागरचना बदलली असून, नव्या प्रभाग रचनेनुसार एका प्रभागात चार सदस्य (नगरसेवक) असणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी सामना अधिकच आव्हानात्मक बनला आहे. दरम्यान, विविध राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले असले तरी, प्रामुख्याने या निवडणुसाठी सामना भाजप विरुद्ध भाजप असाच होणार आहे.धुळे महानगर पालिका निवडणूक कार्यक्रम

  • एकूण प्रभाग - 19
  • एकूण सदस्य संख्या -74
  • मतदान दिनांक - 9 डिसेंबर
  • एकूण मतदार - 3 लाख 29 हजार 569
  • पुरुष मतदार - 1 लाख 74४ हजार 696
  • महिला मतदार - 1 लाख 54 हजार 860

दरम्यान, धुळे महानगरपालिका निवडणूकीत ७४ जागांसाठी ३५५ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस आघाडीने ७४, भाजपने ६२, शिवसेनेने ५०, लोकसंग्राम पक्षाने ६०, ‘रासप’ने १२, ‘एमआयएमए’ने १२, समाजवादी पार्टीने १२ उमेदवार दिले आहेत. (हेही वाचा, धुळ्यात भाजप विरुद्ध स्वाभिमानी भाजप संघर्ष टोकाला)

या निवडणुकीत भाजपने उमेदवार उभे केले असले तरी, भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षानेही उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे भाजप कार्कर्ते आणि मतदारांमध्येही संभ्रम आहे. दुसऱ्या बाजूला भाजपशिवया शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, रासप, संभाजी ब्रिगेड या पक्षांनीही उमेदवार उभे केले आहेत. दरम्यान, शिवसेना आणि लोकसंग्राम पक्ष मित्रत्वाने लढत आहेत. ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार नसतील तेथे शिवसेना लोकसंग्राम पक्षाला पाठिंबा देत आहे. तर, ज्या ठिकाणी लोकसंग्रामचे उमेदवार नाहीत अशा ठिकाणी लोकसंग्राम शिवसेनेला पाठिंबा देत आहे. शिवसेनेच्या पाच उमेदवारांना लोकसंग्रामचा पाठिंबा आहे. तर, १३ वॉर्डात शिवसेनेने लोकसंग्रामला पाठींबा दिला आहे. दरम्यान, मनसेनेही लोकसंग्रामला पाठिंबा दिला आहे. नऊ डिसेंबरला मतदान, तर दहा डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.