प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: File Photo)

राजस्थान (Rajasthan) च्या दौसा (Dausa) जिल्ह्यामध्ये एक विमान गायब झाल्याची माहिती मिळत आहे. विमानातून सिग्नल मिळणे बंद झाल्यावर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. एटीएस जयपुरदेखील या विमानाचे लोकेशन शोधण्यात असमर्थ ठरले आहेत. पायलटने एटीएसला मेसेज पाठवला होता की, विमानाला सिग्नल मिळणे बंद झाले आहे. त्यानंतर सिग्नल पूर्णपणे बंद झाले आणि लोकेशनदेखील ट्रेस होऊ शकत नाही. अशाप्रकारे आकाशात अचानक विमान गायब झाल्याने या विमानाचा स्फोट झाला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या प्लेन क्रॅश (Airplane Crash) बाबत अजूनतरी कोणतीही इतर माहिती समोर आली नाही. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने शोधमोहीम सुरु केली असून, या पार्श्वभूमीवर संपूर्ण दौसा जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. न्यूज 18 ने दिलेल्या बातमीनुसार दौसा जिल्ह्यातील अलवर परिसरात ही प्लेन क्रॅशची घटना घडली असल्याची शक्यता आहे.

दरम्यान जुलैमध्ये हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील एका गावामध्ये मिग -21 हे विमान  कोसळले होते. या दुर्घटनेत भारतीय विमानसेवेतील एका वैमानिकाचा मृत्यू झाला होता.