तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) अतिवृष्टीनंतर पूरसदृश (Floods) परिस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे तुतीकोरीनमधील श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकावर गेल्या 24 तासांत 500 लोक अडकून पडले आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) मदतीने ज्यांची सुटका केली जात आहे. लोकांना वाचवतानाचा व्हिडिओही (Video) समोर आला आहे. लोक स्टेशनवर अडकून पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांच्या समोरून पाणी वेगाने वाहत आहे. एनडीआरएफची टीम पाण्यातून एक-एक करून लोकांना वाचवत आहे आणि त्यांना सुरक्षित स्थळी नेत आहे. तमिळनाडूमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. (हेही वाचा - Cyclone Michaung: मिचौंग चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याने तामिळनाडू 'हाय अलर्ट'वर, 118 ट्रेन रद्द)
पाहा पोस्ट -
National Disaster Response Force is conducting a rescue operation at the Srivaikuntam railway station in Tuticorin, Tamil Nadu. 500 passengers have been stranded for over 24 hours#LokmatTimes #lokmatmedia #naturaldisaster #TamilNaduRains #TamilnaduNews #NewsUpdate #railwaytrack pic.twitter.com/RwLZW202gx
— Lokmat Times Nagpur (@LokmatTimes_ngp) December 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)