Tamil Actor Vijay Unveils TVK Party Flag: लोकप्रिय तमिळ चित्रपट अभिनेते-राजकारणी विजय (Tamil Actor Vijay) यांनी गुरुवारी त्यांच्या राजकीय पक्ष तमिझागा वेत्री कळघम ( Tamizhaga Vetri Kazhagam, TVK) चा ध्वज जारी केला. विजय यांनी पनयुर येथील त्यांच्या पक्षाच्या मुख्यालयात या ध्वजाचे उद्धाटन केले. हा ध्वज दोन रंगांचा आहे, त्याच्या वर आणि खालच्या बाजूस लाल रंग आणि मध्यभागी पिवळा रंग आहे, ज्याच्या मध्यभागी लाल रंगाचे वर्तुळ असून त्याच्या दोन्ही बाजूला दोन हत्ती आहेत.
माझा पक्ष सामाजिक न्यायाचा मार्ग अवलंबणार - विजय
ध्वजाचे अनावरण आणि पक्षगीताच्या अधिकृत प्रकाशनासह TVK तामिळनाडूच्या राजकारणात एका नवीन अध्यायाची सुरु करण्यास सज्ज झाला आहे. राज्यात आगामी 2026 च्या विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी पक्ष तयारी करत आहे. तामिळ अभिनेते विजय यांनी पक्ष ध्वजाच्या उद्धाटन प्रसंगी सांगितले की, 'माझा पक्ष सामाजिक न्यायाचा मार्ग अवलंबणार आहे.' पक्षाचा झेंडा वरच्या बाजूला लाल आणि तळाशी लाल रंगाचा आहे. त्याच वेळी, मध्यभागी पिवळा रंग असून त्यावर दोन हत्ती आणि एक वाघाईचे फूल बनवले आहे, जे विजयाचे प्रतीक आहे. TVK ने पक्षाच्या सोशल मीडिया हँडलवर ध्वजगीत देखील लाँच केले. (हेही वाचा - Vijay Thalapathy Birthday Celebration: 'थलपथी' विजयच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान घडला अपघात; चाहत्याच्या हाताला लागली आग (Watch Video))
तमिझागा वेत्री कळघम पक्ष ध्वजाच्या उद्धाटनाचा व्हिडिओ -
#WATCH | Chennai, Tamil Nadu: Actor and Tamilaga Vettri Kazhagam (TVK) chief Vijay unveils the party's flag and symbol today.
(Source: ANI/TVK) pic.twitter.com/J2nk2aRmsR
— ANI (@ANI) August 22, 2024
विजय यांनी फेब्रुवारीमध्येच आपली राजकीय संघटना सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, 2024 ची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा किंवा निवडणुकीदरम्यान कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. (हेही वाचा -Thalapathy Vijay Announces Political Party: दाक्षिणात्य अभिनेता थलापथी विजयने ठेवलं राजकारणात पाऊल; Tamilaga Vettri Kazhagam पक्षाची केली घोषणा)
थलपती विजय यांची ट्विटर पोस्ट -
Tamilaga Vettri Kazhagam: Flag Anthem | தமிழக வெற்றிக் கழகம்: கொடிப் பாடல்https://t.co/KC0nKrK5au pic.twitter.com/dbJxbE5S92
— Vijay (@actorvijay) August 22, 2024
TVK ध्वज उद्धाटनादरम्यान अभिनेता आणि कार्यकर्त्यांनी घेतली शपथ -
TVK ध्वज उद्धाटनादरम्यान अभिनेता आणि कार्यकर्त्यांनी शपथ घेतली. या शपथेमध्ये असे म्हटले आहे की, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांचे आणि तामिळ भूमीत आपल्या लोकांच्या हक्कांसाठी अथकपणे लढलेल्या असंख्य सैनिकांचे आम्ही नेहमीच कौतुक करू. जात, धर्म, लिंग, जन्मस्थान या नावावर होणारा भेदभाव नष्ट करून लोकांमध्ये जागृती निर्माण करून सर्वांना समान संधी आणि समान हक्क मिळावेत यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करू.