12th Board Exams 2021: बारावीचा निकाल 31 जुलै पर्यंत घोषित करण्याचे सुप्रीम कोर्टाचे सर्व राज्यांना आदेश
Supreme Court | This Image is Used for Representational Purpose. (Photo Credits: ANI)

देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर 12 वी बोर्डाच्या परीक्षा (HSC Exam) रद्द करण्यात आल्या. त्यामुळे अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. यावरुन सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सर्व राज्य बोर्डांना आजपासून 10 दिवसाच्या आत मुल्यांकनाची योजना जारी करण्यास सांगितली आहे. त्याचबरोबर सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसई (ICSE) बोर्डाप्रमाणे 31 जुलै पर्यंत 12 वीचे निकाल जाहीर करण्याचेही निर्देश दिले आहेत.

देशात सर्व राज्यांच्या बोर्डांसाठी मुल्यांकनाची एकच योजना असू शकत नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. बारावीची परीक्षा रद्द करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेताना असा आदेश मंजूर करण्यास नकार दिला आहे. (Maharashtra 10th Board Exam 2021: इयत्ता 10 वी परीक्षा मुल्यांकनाबाबत शिक्षण विभागाकडून तपशील जारी)

ANI Tweet:

तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सीबीएसई आणि सीआयसीएसईच्या 12 वीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आणि विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी मंडळाने प्रस्तावित केलेल्या मूल्यांकन योजनांना मान्यता दिली.

अंतिम निकालासाठी मुल्यांकन करताना तीन प्रकारचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. दहावीच्या 3  विषयांच्या सर्वोत्कृष्ट गुणांची सरासरी, 11 वीच्या अंतिम परिक्षेत केलेल्या कामगिरीतील 30 टक्के गुण, उर्वरीत 40 टक्के गुण बारावी इयत्तेत घेतलेल्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि प्रिलीम्स परीक्षा यांच्या गुणांच्या आधारावर देण्यात येतील. दरम्यान, सीबीएसईचा दहावीचा बोर्ड निकाल 20 जुलैपर्यंत आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणार आहे.