Sovereign Gold Bond Scheme 2020-21: 5व्या टप्प्यातील गोल्ड बॉन्ड खरेदीसाठी उपलब्ध; 7 ऑगस्ट पर्यंत प्रतिग्राम 5,334 रूपयांमध्ये करू शकता गुंतवणूक
Gold | Representational Image | (Photo Credits: PTI)

भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बॅंक इंडियाकडून (RBI)  सुरू करण्यात आलेल्या गोल्ड बॉन्डला (Gold Bond) आजपासून (3  ऑगस्ट)  सुरूवात झाली आहे. दरम्यान 3 ते 7 ऑगस्ट दरम्यान हा गोल्ड बॉन्डचा पाचवा टप्पा असेल. यामध्ये प्रति ग्राम सोन्याचा दर 5,334 रूपये इतका असेल. अशी माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी जुलै महिन्यात उपलब्ध करून दिलेल्या गोल्ड बॉन्डमध्ये प्रति ग्राम सोन्याचा दर 4852 इतका होता.

दरम्यान तुम्ही ऑनलाईन माध्यमातून खरेदी केल्यास या व्हावहारामध्ये प्रत्येक वेळेप्रमाणे 50 रूपयांची सूट मिळणार आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करणार्‍यांसाठी हा दर प्रतिग्राम 5284 इतका असेल. एप्रिल महिन्यापासून जाहीर करण्यात आलेल्या या गोल्ड बॉन्ड स्किमचे सहा टप्पे असतील. पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात या गोल्ड बॉन्ड स्किमचा अंतिम टप्प्पा असणार आहे.

भारतामध्ये सोनं हे दागिन्यांच्या स्वरूपात विकत घेण्याकडे ग्राहकांचा मोठा कल असतो. पण अशाप्रकारे सुरक्षित ठेवणं हेदेखील मोठं जिकरीचे आहे. त्याला आता पर्याय म्हणून गोल्ड बॉन्ड हे डिजिटल स्वरूपातील सोनं खरेदीचं माध्यम उपलब्ध करण्यात आलं आहे.

दरम्यान 1 ग्रामपासून त्याच टप्प्यात सोनं खरेदी केली जाऊ शकते. गुंतवणूकदारांना किमान 1 ग्राम ते 4 किलो पर्यंत सोनं खरेदी करण्याची मुभा आहे. तर ट्र्स्टसाठी सोनं खरेदीची कमाल मर्यादा 20 किलो पर्यंत आहे. दरम्यान गोल्ड बॉन्ड्सची कालमर्यादा ही 8 वर्षांसाठी आहे. पाच वर्षांनंतर त्याचा एक्झिट प्लॅन देखील आहे. यावर कर्जदेखील घेता येऊ शकतं.

Sovereign Gold Bond Scheme भारतामध्ये 2015 साली लॉन्च झाली आहे. फिजिकल गोल्ड विकत घेण्यापेक्षा बचतीच्या मार्गासाठी सोन्याच्या खरेदीचा असा एक पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची ही एक पॉलिसी आहे.