पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जनता कर्फ्यू' ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल देशवासियांचे मानले आभार, म्हणाले 'हा नाद विजयाची सुरुवात सांगणारा आहे'
आज देशभरात सर्वांनी संध्याकाळी 5 वाजता आपल्या घराच्या गॅलरीत, दरवाज्याजवळ, खिडकीत येऊन घंटानाद केला. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीही भारावून गेले. त्यांनी संपू्र्ण देशवासियांच्या ट्विटच्या माध्यमातून आभार मानले.
कोरोना व्हायरस ग्रस्तांचा आकडा भारतात दिवसेंदिवस वाढत चालला असून संपूर्ण भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'जनता कर्फ्यू' ठेवला होता. या मोहिमेला संपूर्ण भारतवासियांनी भरघोस प्रतिसाद देत संध्याकाळी 5:00 वाजता टाळ्या, थाळ्यांच्या आवाजात घंटानाद केला. जनतेने केलेल्या हा सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी संपूर्ण देशवासियांचे आभार मानले. हा एक धन्यवादाचा नाद आहे असे मोदींनी ट्विट च्या माध्यमातून सांगितले.
आज देशभरात सर्वांनी संध्याकाळी 5 वाजता आपल्या घराच्या गॅलरीत, दरवाज्याजवळ, खिडकीत येऊन घंटानाद केला. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीही भारावून गेले. त्यांनी संपू्र्ण देशवासियांच्या ट्विटच्या माध्यमातून आभार मानले.
पाहा मोदींचे ट्विट
कोरोना वायरस की लड़ाई का नेतृत्व करने वाले प्रत्येक व्यक्ति को देश ने एक मन होकर धन्यवाद अर्पित किया। देशवासियों का बहुत-बहुत आभार... #JantaCurfew
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2020
ये धन्यवाद का नाद है, लेकिन साथ ही एक लंबी लड़ाई में विजय की शुरुआत का भी नाद है। आइए, इसी संकल्प के साथ, इसी संयम के साथ एक लंबी लड़ाई के लिए अपने आप को बंधनों (Social Distancing) में बांध लें। #JantaCurfew
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2020
हेदेखील वाचा- भारतात COVID-19 ग्रस्तांच्या संख्येत आणखी वाढ, रुग्णांचा आकडा 341 वर- आरोग्य मंत्रालय
'हा केवळ एक नाद नसून ही एका मोठ्या लढाईतील विजयाची सुरुवात आहे' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता या मोठ्या लढाईसाठी तयार व्हा आणि स्वत:वर काही बंधने घाला असे आवाहन मोदींनी या ट्विटमधून केले आहे.
भारतात कोरोना व्हायरस रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन हा आकडा 341 वर गेल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली ही आहे. ही खूप धक्कादायक बातमी असून अन्य देशांप्रमाणे आता भारतातील स्थिती देखील चिंताजनक बनत चालल्याचे चित्र यावरून दिसून येतय.
(The above story first appeared on LatestLY on Mar 22, 2020 06:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

