Representational Image | (Photo Credits: File Photo)

पेट्रोल डिझेलच्या (Petrol-Diesel) दरात घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीत 25 एप्रिलनंतर पहिल्यांदा पेट्रोलचा दर कमी झाला. 25 एप्रिल रोजी दिल्लीत पेट्रोलचा दर  73 रुपये प्रति लीटर होता. तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त झाले. तेल कंपन्यांमध्ये पेट्रोलचे दर गुरुवारी (9 मे) दिल्ली, कोलकता आणि चेन्नईत 16 पैशांनी कमी झाले तर मुंबईत 15 पैसे प्रति लीटरने घटले.

दिल्लीत डिझेलचे भाव 10 पैशांनी आणि कोलकतामध्ये 8 पैशांनी कमी झाले. मुंबई आणि चेन्नईत 7 पैसे प्रती लीटरने हे दर घटले.

देशातील प्रमुख शहरात आज असलेले पेट्रोल-डिझेलचे दर प्रती लीटरनुसार:

शहरं पेट्रोल डिझेल
दिल्ली 72.84 रुपये 66.56 रुपये
कोलकता 74.88 रुपये 68.32 रुपये
मुंबई 78.44 रुपये 69.74 रुपये
चेन्नई 75.63 रुपये 70.36 रुपये

इंडियन ऑईल वेबसाईटनुसार, दिल्ली, कोलकता, मुंबई आणि चेन्नईत पेट्रोलचे दर अनुक्रमे 72.84 रुपये, 74.88 रुपये, 78.44 रुपये आणि 75.63 रुपये प्रती लीटर आहे. तर डिझेलचे दर कमी होऊन अनुक्रमे 66.56 रुपये, 68.32 रुपये, 69.74 रुपये आणि 70.36 रुपये प्रती लीटर झाले आहेत.