पेट्रोल-डिझेल. (Photo Credits: PTI)

भारतात (India) सलग 23 दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आजचा दिवस सर्वांना दिलासा देणारा ठरला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज कोणतीही दरवाढ झाली नसून आज पेट्रोल-डिझेलचे दर काल (29 जून) च्या दरावरच स्थिरावले आहेत. त्यानुसार, आज नवी दिल्लीत (Navi Delhi) पेट्रोलचे (Petrol) दर 80.43 रुपये आणि डिझेल (Diesel) 80.53 रुपये इतके आहेत. त्याचबरोबर मुंबई (Mumbai) आणि अन्य महत्त्वाच्या शहरात पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे आहेत. सततच्या इंधन दरवाढीमुळे (Fuel) त्रस्त झालेल्या नागिरकांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे.

तर मुंबईत पेट्रोलचे दर 87.19 रुपये प्रति लीटर असून डिझेल 78.83 रुपये प्रति लीटर इतके आहे.

हेदेखील वाचा-

पाहूयात भारतातील महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

शहर पेट्रोल डिझेल
मुंबई रु.  87.19 रु. 78.83
दिल्ली रु. 80.43  रु. 80.53
चेन्नई रु. 83.71 रु. 77.80
कोलकाता रु.  82.10 रु. 75.64

ऑईल कंपन्या 7 जून पासून इंधनाच्या दरात वाढ करत आहेत. कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे तब्बल 82 दिवसांचा ब्रेक लागला होता. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी इंधनाच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. मार्चच्या मध्यात पेट्रोल-डिझेलचे दर अखेरचे वाढले होते. त्यानंतर ते 6 जून पर्यंत स्थिर होते.