Lok Sabha Election 2019: तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक 2019 च्या प्रचारतोफा थंडावल्या; माढा, बारामती सह महाराष्ट्रात 14 तर देशात 116 मतदार संघांमध्ये 23 एप्रिलला मतदान
Lok Sabha Elections (file Photo)

महाराष्ट्रात यंदा लोकसभा निवडणूक 2019 चार टप्प्यात पार पडणार आहे. त्यापैकी येत्या 23 एप्रिल दिवशी होणार्‍या तिसर्‍या टप्प्यातील मतदानासाठीच्याप्रचाराच्या तोफा आज (21 एप्रिल) च्या संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या आहेत. 23 तारखेला महाराष्ट्रात 14 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या हायप्रोफाईल मतदारसंघांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक 2019 च्या तिसर्‍या टप्प्यात कोणामध्ये होणार चुरशीची लढाई?

लोकसभा निवडणूक 2019 च्या तिसर्‍या टप्प्यात बारामतीमध्ये कांचल कूल विरूद्ध सुप्रिया सुळे, माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः उमेद्वारी मागे घेऊन संजय मामा शिंदे यांना तिकीट दिले आहे. तर विखे पाटील कुटुंबातून कॉंग्रेस पक्षाला धक्का देत डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश मिळवत प्रथमच निवडणूकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघांसोबतच  हातकणं गले मधून  राजू शेट्टीआणि कोकणातून राणे विरूद्ध शिवसेना ही लढत चुरशीची होणार  आहे. Lok Sabha Elections 2019 मतदान व मतमोजणी मुळे मुंबई, गोवा, दिल्ली, बंगळुरू मध्ये कोण कोणत्या दिवशी Dry Day?

23 एप्रिल दिवशी सकाळी  7  ते  संध्याकाळी 6  या वेळात मतदान करण्याचीसोय आहे. तर लोकस्भा निवडणूकीची मतमोजणी 23 मे ला होणार आहे.