Lok Sabha Election 2024 Result: भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) लोकसभा निवडणुकीसाठी अधिकृत मतमोजणीचे प्रारंभिक आकडे जारी केले आहेत. यामध्ये भाजप आघाडीवर आहे. त्यानंतर अनुक्रमे काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसचा क्रमांक लागतो. अधिकृत आकडेवारीनुसार, लोकसभेच्या 543 जागांवर झालेल्या निवडणुकीत भाजप 231 जागांवर आघाडीवर आहे. त्यानंतर काँग्रेस (100), समाजवादी पार्टी (33), तृणमूल काँग्रेस (22) आणि द्रमुक (17) आहेत. आयोगाच्या आकडेवारीनुसार पक्षनिहाय मताधिक्यही भाजपच्या बाजूने आहे. त्यांना 40.21 टक्के मते मिळाली. त्यानंतर काँग्रेस 26.80 टक्के आणि सपा 3.78 टक्के आहे.