झारखंड मध्ये बसला भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू 30 पेक्षा अधिक जखमी
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

झारखंड (Jharkhand) येथे बसला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.तसेच मृत व्यक्तींच्या परिवाराला प्रशासनाकडून 50,000 रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.

देवघर जिल्ह्यातील कछुआबंध येथील गावाजवळ बस उलटून हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन महिला आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तर पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. तसेच बसचालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून प्रवाशांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. तर रुग्णांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.