Examinations | (Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com)

Institute of Chartered Accountants of India कडून आता सीए परीक्षेच्या ( CA Exam) सिस्टिम मध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. जारी नव्या माहितीनूसार, सीए ची अंतिम परीक्षा आता वर्षातून 3 वेळेस घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या परीक्षेला सामोरे जाण्याची अधिक संधी मिळणार आहे. दरम्यान मागील वर्षी ICAI ने CA Intermediate आणि Foundation examinations वर्षातील 3 वेळेस घेतली होती. आता नव्या निर्णयानुसार, CA Final, Inter आणि Foundation या तिन्ही स्तरावरील परीक्षा वर्षातून 3 वेळेस घेतल्या जाणार आहेत. 27 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या 441 व्या परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ICAI च्या माहितीनुसार, या परीक्षेचं आयोजन दरवर्षी जानेवारी, मे आणि सप्टेंबर महिन्यात केले जाणार आहे. याव्यतिरिक्त, assessment test for the post-qualification course in Information Systems Audit साठी मूल्यांकन चाचणी देखील वर्षातून तीन वेळा घेतली जाईल - फेब्रुवारी, जून आणि ऑक्टोबरमध्ये. सध्या, ही चाचणी दर दोन वर्षांनी घेतली जाते.

ICAI ही भारतातील चार्टर्ड अकाउंटंट्स व्यवसायाचे नियमन आणि विकास करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट्स कायदा, 1949 अंतर्गत संसदेच्या कायद्याद्वारे स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे. हे Ministry of Corporate Affairs च्या प्रशासकीय देखरेखीखाली काम करते.