Gold | File Image

सध्या लग्नसराईचा काळ सुरू असल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्या,चांदीच्या वस्तूंची, दागिन्यांची खरेदी केली जाते. मागील काही दिवसांत सोन्याचा भाव वधारला होता पण आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा दर खाली आल्याने सामान्यांना आज दिलासा मिळाला आहे. बुलियन मार्केट मध्ये मागील आठवड्यात 77570 रूपये प्रति तोळा 24 कॅरेट सोन्याचा दर आज 70100 पर्यंत खाली आहे. तर चांदीच्या दरामध्येही घसरण झाली आहे. 95,010 रूपये प्रतिकिलो चांदी आता 90780 पर्यंत खाली आली आहे.

आज सोमवार 16 डिसेंबर रोजी भारतातील सोन्याचे भाव स्थिर राहिले आहेत. गुंतवणूकदार आठवड्याच्या शेवटी जाहीर होणाऱ्या यूएस फेडरल रिझर्व्हच्या चलनविषयक धोरणाच्या निकालांची वाट पाहत होते. दरम्यान, एमसीएक्सच्या सोन्या-चांदीच्या किंमती किरकोळ घसरल्या आणि रु. 77,000 आणि 91,000 वर टिकून आहे. सध्या, भारतात सर्वात स्वस्त सोन्याचे दर 22K मध्ये 7,140 रुपये आणि 24K मध्ये 7,789 रुपये प्रति 1 ग्रॅम आहेत.

पहा आजचा सोन्याचा, चांदीचा दर काय?

 

भारतामध्ये 1  एप्रिल 2023 पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत. त्यामुळे तुमची फसवणूक होत नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. प्रामुख्याने दागिने घडवताना 23 कॅरेट मध्ये बनवले जातात तर 24 कॅरेट सोनं हे गुंतवणूकीच्या दृष्टीने घेतलं जातं.