Gold Rate Today: सोन्याच्या दरात सलग तिस-या दिवशी घसरण; पाहा काय आजचा भाव
Gold Rate | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Gold Rate on 5th February: कोरोना व्हायरस मुळे देशात निर्माण झालेला आर्थिक तुटवडा भरुन काढण्यासाठी सोन्याचे दर सलग तिस-या दिवशी घसरले आहेत. आज सोन्याचे (Gold) भाव 396 रुपयांनी कमी झाले असून 10 ग्रॅममागे 40,871 इतका सोन्याचा भाव झाला आहे. 4 फेब्रुवारीला सोन्याचा भाव 41,267 रुपये इतका होता. तर दुसरीकडे दरात 179 रुपयांची घट झाली असून चांदीचा (Silver) दर प्रति किलोमागे 46,881 रुपये इतका झाला आहे. हाच भाव मंगळवारी 47,060 रुपये इतका होता.

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे भाव 396 रुपयांनी तर चांदीचा भाव 179 रुपयांनी घसरला असल्याचे HDFC चे ज्येष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी दिली.

हेदेखील वाचा- Gold Rate Today: सोनं महागलं, सराफा बाजारातील आजचे दर 41 हजारांच्या पार

सोनेचांदीच्या भावात घसरण कशामुळे?

HDFC सिक्युरीटीजचे सीनिअर अ‍ॅनालिस्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या रुपयाच्या घसरणीमुळे त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. त्याचप्रमाणे चीनच्या सेंट्रल बँकेमध्ये दिवाळखोरी जाहीर होऊ शकते. याच कारणाने देशभरातील शेअर मार्केटने पुन्हा उसळी घेतली असून गुंतवणूकदारांचा कल आता सोन्याकडे नसल्याचं दिसत आहे.

तर दुसरीकडे दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करत असलेला कोरोना व्हायरस आणि त्यामुळे निर्माण होणारा आर्थिक तुटवडा भरून काढण्यासाठीही सोन्याचे दर गडगडल्याचे सांगितले आहे.

महिन्याभरापूर्वी  अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये वाढत्या तणावामुळे शेअर बाजारात घसरण झाल्याचे दिसून आले. ज्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय गोल्ड मार्केट होऊन सोने-चांदीचे दर वाढले होते.