Migrant Workers | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Aatmanirbhar Bharat Economic Package:  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी भारतामध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केल्यानंतर आता कोरोना व्हायरस भोवती आपलं आयुष्य न ठेवता आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचा नारा दिला. दरम्यान त्यासाठी भारत सरकार 20 लाख कोटी रूपयांची तरतूद करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या आर्थिक पॅकेज अंतर्गत आज शेतकरी आणि मजुरांसाठी काही खास घोषणा करताना आता भारत सरकार पुढील अजून 2 महिन्यांसाठी मजुरांना, गोर गरिबांना मोफत अन्नधान्य देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये प्रति माणसी 5 किलो गहू किंवा 5 किलो तांदूळ देणार आहेत. सोबत 1किलो चना डाळ देणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे यासाठी देशात कुठल्याही दुकानात रेशन घेता येणार, वन नेशन-वन रेशन कार्ड लागू करणार आहे. तसेच रेशन कार्ड नसणार्‍यांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

भारत सरकारने या मोफत अन्नधान्य वाटपासाठी 3500 कोटींची तरतूद केली असून सुमारे 8 कोटी मजुरांना अजून 2 महिने मोफत अन्नधान्य मिळणार आहे. दरम्यान स्थलांतरित मजुरांना आता मनरेगा अंतर्गत काम देण्याची सुविधा देखील करण्यात आली आहे. Atma Nirbhar Bharat Abhiyan: शेल्टर होममध्ये बेघर लोकांना मिळणार 3 वेळचे अन्न- अर्थमंत्री निर्मला सीतारमण

काल एमएसएमई (MSME) सेक्टरला तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले जाईल. अशी घोषणा करण्यात आली. 31 ऑक्टोबर 2020 च्या पूर्वी एमएसएमईला कर्ज सेवा मिळेल. 3 लाख कोटी पर्यंतचे कर्ज विना गॅरेंटी दिले जाईल. 45 लाख एमएसएमईला याचा फायदा होईल. विशेष म्हणजे याला एक वर्षांपर्यंत कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही. अडचणीत असलेल्या एमएसएमईला 20,000 कोटी रुपयांचे कर्ज दिले जाईल. असे देखील सांगण्यात आले आहे.