Uddhav Thackeray | (Photo Credits: X)

Fake Image Of Uddhav Thackeray: सोशल मीडियावर दररोज मोठ्या प्रमाणात खोट्या बातम्या व्हायरल होत असतात. या खोट्या बातम्या सामान्य माणसांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत अनेकांना लक्ष्य करून पसरवल्या जातात. आता उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्याशी संबंधित फेक न्यूजचे ताजे प्रकरण समोर आले आहे. उद्धव आणि राहुल गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर होत असून, त्यामध्ये उद्धव ठाकरे राहुल गांधींपुढे नतमस्तक होताना दिसत आहेत. अनेकांनी हा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. मात्र प्रत्यक्षात हा फोटो पूर्णतः खोटा, बनावट आहे.

शिवसेनेने (UBT) गुरुवारी X वरील एका पोस्टमध्ये, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या फोटोवर प्रतिक्रिया दिली, शिवसेना (UBT) ने हा फोटो बनावट असल्याचे आणि प्रतिमेत फेरफार करण्यात आल्याचे म्हटले आहे. शिवसेना (UBT) ने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘या बनावट आणि फेरफार केलेल्या प्रतिमा ट्विट केल्याबद्दल आम्ही पोलिसात गुन्हा दाखल करणार आहेत. आहोत. खोटे बोलणे आणि खोटे राहणे हा 'भाजप'चा डीएनए आहे, हे आम्हाला माहीत आहे.’ (हेही वाचा: Home राजकीय Ajit Pawar on Baramati Seat: अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले असून, या जागेवरून मुलगा जय यांना उमेदवारी देऊ शकते)

ही व्हायरल इमेज 'द जयपूर डायलॉग्स' नावाच्या हँडलने X वर पोस्ट केली होती. मात्र फोटो जवळून पाहिल्यास हे स्पष्टपणे दिसून येते की, व्हायरल झालेली प्रतिमा संपादित आहे. दोन्ही वेगवेगळे फोटो एकत्र जोडले आहेत. यातील उद्धव ठाकरेंचा फोटो हा नुकतेच त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यावेळचा आहे. उद्धव ठाकरे केजरीवाल यांच्या पालकांना वाकून नमस्कार करत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये ते राहुल गांधी यांच्यासोबत उभे आहेत. हे दोन्ही फोटो एकत्र करून नवा फोटो तयार करण्यात आला आहे.