यूपी पोलिसांनी प्रसिद्ध यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादवच्या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सेक्टर 49 पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप चौधरी यांच्यावर कारवाई केली आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसू न शकल्याने आणि तपासात हलगर्जीपणा दाखवल्याने पोलीस ठाणे प्रभारींवर ही कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईची माहिती अतिरिक्त आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) आनंद कुलकर्णी यांनी रविवारी दिली.

दिल्ली-एनसीआरमधील पार्ट्यांमध्ये करमणुकीसाठी सापाचे विष दिल्याप्रकरणी यादवसह अन्य पाच जणांवर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पशु कल्याण कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली होती.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)