मध्य प्रदेशातील करण्यात आला आहे. गुजरात एटीएस आणि दिल्ली एनसीबीने ही कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष सिंघवी यांनीही या कारवाईची माहिती सोशल मीडियावर दिली. ( हेही वाचा - Gujarat Drug Case: गुजरात एटीएसची मोठी कारवाई, मुंबईत 800 कोटी रुपयांचे एमडी ड्रग जप्त )
भोपाळ पोलिसांना या कारवाईपासून दूर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बागरोडा येथील औद्योगिक परिसरात ही कारवाई करण्यात आली. विभागाने येथून 907 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. कारखान्यातून एमडी ड्रग्ज आणि इतर अनेक वस्तूही अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत. एमडी ड्रग्जमध्ये वापरलेला ५ हजार किलोचा कच्चा मालही जप्त करण्यात आला आहे. यासोबतच या ठिकाणाहून ग्राइंडर, मोटार, काचेचे फ्लास्क, हिटरही सापडले.
पाहा पोस्ट -
भोपाल - गुजरात एटीएस और दिल्ली एनसीबी ने फैक्ट्री पर मारा छापा, 1800 करोड़ से अधिक की एमडी ड्रग्स जब्त, दो आरोपी गिरफ्तार, कटारा हिल्स थाना क्षेत्र के इंडस्ट्रियल एरिया बगरोदा पठार में हुई कार्रवाई #Bhopal #NCB #ATS #MDDrugs #Raid @CP_Bhopal @MPPoliceDeptt #MPNews… pic.twitter.com/AzV8k3xOVa
— Peoples Samachar (@psamachar1) October 6, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, हे आरोपी बंद कारखान्यात ड्रग्ज बनवत होते. गुजरातमधील सुरत येथे पकडलेल्या आरोपींकडून माहिती मिळाल्यानंतर भोपाळमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली. आरोपींसोबत भोपाळहून टीम निघाल्याची माहिती समोर आली आहे.