Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
19 minutes ago

विदेशातून आणलेले मास्क धुवून विक्री प्रकरणी नारपोली येथे गुन्हा दाखल; 8 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Bhakti Aghav | Mar 08, 2020 11:15 PM IST
A+
A-
08 Mar, 23:15 (IST)

विदेशातून आणलेले मास्क धुवून विक्री प्रकरणी भिवंडी, नारपोली येथे गुन्हा दाखल. इमरान शेख नावाच्या व्यक्तीवर हा गुन्हा दाखल झाला आहे. उघड्यावर फेकून दिलेले सर्व मास्क एकत्र करून त्यांची जैव वैद्यकीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ते पॉल्युशन बोर्डच्या ताब्यात देण्यात आले आहेत. 

08 Mar, 22:18 (IST)

सध्या महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे सव्वादोन लाख अधिकारी-कर्मचारी आहेत. त्यापैकी 28 हजार म्हणजेच 15 टक्क्याच्या आसपास महिला कर्मचारी आहेत. महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचे हे प्रमाण 15 टक्क्यांहून 30 टक्क्यापर्यंत नेण्याच्या दृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. 

08 Mar, 21:28 (IST)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई व पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर 904 विमानांमधील 1 लाख 9 हजार 118 प्रवाशांची तपासणी झाली आहे. कोरोना व्हायरस संबंधित माहितीसाठी राज्य नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 020- 26127394, टोल फ्री क्रमांक 104 वर संपर्क साधता येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

08 Mar, 20:38 (IST)

कर्नाटकचे माजी राज्यपाल आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री हंसराज भारद्वाज यांचे आज निधन झाले.

08 Mar, 20:10 (IST)

कोरोना व्हायरसमुळे लेह लद्दाख मधील  शाळा 31 मार्च पर्यंत बंद राहणार असल्याचा निर्णय जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिला आहे.

08 Mar, 19:26 (IST)

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना आज ईडीकडून पहाटेच्या वेळेस अटक करण्यात आली. त्यानंतर परिवाराला ईडीने नोटिस सुद्धा पाठवली. तर आता राणा कपूर यांची मुलगी रोशनी ही मुंबई सोडून लंडन येथे जाण्यासाठी निघाली असता तिला विमानतळावर अडवण्यात आले आहे.

08 Mar, 18:46 (IST)

नेदरलॅंड्स येथे कोरोना व्हायरसची 77 नवी प्रकरणे समोर आली आहेत.

08 Mar, 18:20 (IST)

हुबळी येथे जागतिक महिलादिनानिमित्त महिला कर्मचाऱ्याने ट्रेन चालवली आहे.

08 Mar, 17:52 (IST)

भोपाळ येथे ट्रक आणि स्कूटरमध्ये भीषण अपघात झाला असून चार जणांचा मृत्यू तर दोन जण गंभीर झाले आहेत.

08 Mar, 17:32 (IST)

सर्व बँकांच्या कामावर सातत्याने लक्ष असल्याने ठेवीदारांचे पैसे सुरक्षित असल्याचे आरबीआयकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

Load More

आज संपूर्ण जगभरात महिला दिन साजरा होत आहे. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, 8 मार्च हा दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. विशेष म्हणजे आज गुगलनेही डूडलच्या माध्यमातून महिलांसाठी एक व्हिडिओ समर्पित केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रत्येक क्षेत्रातील महिला दाखवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आज महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आल आहे. आज मुंबईतील तीनही मार्गावर मेगाब्लॉग नसणार आहे. परंतु, मध्य रेल्वेने ठाणे-वाशी-नेरुळ-पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेकडून वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान आज रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील मुख्य आणि हार्बर मार्गासह पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसभरात कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

तसेच येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल 30 तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. येस बँक घोटाळा उघड झाल्यानंतर ईडीने शुक्रवारी रात्री राणा कपूर यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर त्यांची शनिवारी दिवसभर चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर कपूर यांना अटक करण्यात आली आहे. आज सकाळी 11 वाजता कपूर यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


Show Full Article Share Now