Rajasthan CM Ashok Gehlot (Photo Credits: IANS)

राजस्थानच्या कोटा (Kota) येथील रुग्णालयात 48 तासांमध्ये 10 मुलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कोटाच्या सर्वात मोठ्या जेके लोन रुग्णालयात (JJ Lon Children Hospital) गेल्या 2 दिवसात 10 मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या सर्व मुलांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

हे प्रकरण समोर आल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Rajasthan CM Ashok Gehlot) यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे कोटाचे खासदार लोकसभेचे अध्यक्ष आम बिर्ला यांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून, राज्य सरकारने त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.

आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी, मुलांच्या मृत्यूबद्दल अत्यंत असंवेदनशील विधान केले आहे. शनिवारी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ‘राज्यातील प्रत्येक रुग्णालयात दररोज 3-4 मृत्यू होतात त्यामुळे या गोष्टी काही नवीन नाहीत.’ यावेळी त्यांनी दावा केला की यावर्षी गेल्या 6 वर्षात सर्वात कमी मृत्यू झाले आहेत. ते पुढे म्हणाले, ‘एकाही मुलाचा मृत्यू दुर्दैवी आहे परंतु याआधी वर्षाला 1400, 1500 मुलांचे मृत्यू झाले आहेत. मात्र त्यामानाने यावर्षी कमी म्हणजे सुमारे 900 मृत्यू झाले आहेत.’ दरम्यान याच महिन्यात या हॉस्पिटलमध्ये एकूण 77 जणांचा मृत्यू झाला आहे.

एएनआय व्हिडीओ -

रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे, 23 डिसेंबर रोजी सहा मुलांचा मृत्यू झाला, तर 24 डिसेंबर रोजी 4 मुलांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच मुली आणि तितकीच मुले आहेत. त्यांचे वय एक दिवसापासून एका वर्षापर्यंत आहे. अनेक प्रकरणात अगदी शेवटच्या स्टेजला लह्गन मुलांना खासगी किंवा सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तोपर्यंत वेळ गेलेली असते व मुलांचा मृत्यू होतो. यामुळे दररोज सरासरी 1 मुलाचा मृत्यू होतो.