Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
3 hours ago

Maharashtra Swine Flu: महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचा धोका वाढला, 432 रुग्ण पॉझिटिव्ह, 15 जणांचा मृत्यू

देशातील कोरोनाचा धोका आता टळला आहे. पण महाराष्ट्रात एका नवीन आजाराने पाय पसरायला सुरुवात केली आहे. मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत असल्याने लोकांची चिंता वाढली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी 15 जूनपर्यंत राज्यात स्वाइन फ्लूचे 432 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 15 रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.

राष्ट्रीय Shreya Varke | Jun 25, 2024 03:48 PM IST
A+
A-

Maharashtra Swine Flu: देशातील कोरोनाचा धोका आता टळला आहे. पण महाराष्ट्रात एका नवीन आजाराने पाय पसरायला सुरुवात केली आहे. मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत असल्याने लोकांची चिंता वाढली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी 15 जूनपर्यंत राज्यात स्वाइन फ्लूचे 432 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 15 रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून मुंबईत डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्णही वाढू लागले आहेत. मात्र स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने चिंतेमध्ये भर पडली आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात सध्या स्वाइन फ्लूचे रुग्ण आहेत. मुंबईत सध्या उष्ण आणि दमट वातावरण असल्याने या फ्लूसाठी प्रतिकूल आहे. त्यामुळे हा आजार पसरत आहे.

सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी आणि घसा खवखवण्याची लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला लोकांना देण्यात येत आहे. मात्र, 'स्वाइन फ्लूचे रुग्ण लवकर बरे होतात, असे अनेक पुरावे आहेत, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती शिंकते, खोकते किंवा थुंकते तेव्हा हा विषाणू पसरतो. घाणेरड्या पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर तेच हात नाकाला किंवा डोळ्यांना लागले तर या संसर्गामध्ये लहान मुले, गरोदर महिला, वृद्ध, हृदय व फुफ्फुसाचे रुग्ण आणि इतर आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


Show Full Article Share Now