Photo Credit- X

Jammu and Kashmir: मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 6.30 च्या सुमारास उधमपूर (Udhampur) जिल्हा मुख्यालयातील काली माता मंदिराबाहेर पोलिस व्हॅनमध्ये पोलिसांचे मृतदेह (Police Personnel Found Dead) आढळले. त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. अधिका-यांनी सांगितले की, पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेले आहेत.(Jammu Kashmir Road Accident: जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये वाहन दरीत कोसळल्याने चार ठार; 14 जखमी)

गोळीबारात दोन्ही पोलिसांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेमागे आपसी कलह असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एसएसपी उधमपूर आमोद नागपुरे यांनी प्रसार माध्यामांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, उधमपूर जिल्ह्यातील रहमबल भागात आपसी भांडण आणि आत्महत्येच्या घटनेत दोन पोलिसांचा मृत्यू झाला. तर, एक जण जखमी झाला. पोलीस कर्मचारी विभागाच्या वाहनातून सोपोरमधील एसटीसी तलवाडा येथे जात असताना गोळीबारात ते जखमी झाले. घटनेमागील सत्य शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

एसएसपी उधमपूर आमोद नागपुरे म्हणाले की, "सकाळी 6.30 वाजता ही घटना घडली. पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. प्राथमिक तपासात या घटनेत एके-47 रायफलचा वापर झाल्याचे सिद्ध झाले आहे. दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तिसरा पोलिस कर्मचारी सुरक्षित असून त्यांना पोस्टमॉर्टम आणि इतर प्रक्रियेसाठी GMC उधमपूर येथे नेण्यात येईल.