President Ram Nath Kovind: साडेचार वर्षात मी 12 वेळा महाराष्ट्रात आलो, या भूमीचा खास वैशिष्ट्ये - रामनाथ कोविंद
राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Photo Credits: PTI/File)

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath kovind) यांच्या हस्ते मुंबईत राजभवनाच्या (Mumbai) नव्या Durbar Hall चं उद्घाटन  करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, (Bhagaht Singh koshyari) मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे, (Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) मंत्री आदित्य ठाकरे, (Aditya Thackeray) अदिती तटकरे (Aditi Tatkeray) आदी मंडळी देखील उपस्थित होती.  नव्या दरबार मध्ये आसनक्षमता देखील पूर्वीपेक्षा वाढवली आहे. या दरम्यान राष्ट्रपती यांनी महाराष्ट्राबद्दलचे मनोगत मांडले. राष्ट्रपती म्हणतात, लोक आणि अर्थातच या भूमीची खास वैशिष्ट्ये मला इथे खेचतात. गेल्या साडेचार वर्षात मी 12 वेळा महाराष्ट्राला भेट दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि केशव बळीराम हेडगेवार यांसारख्या अनेक महापुरुषांचे नेतृत्व या महाराष्ट्राला लाभले आहे. महाराष्ट्रातील जनतेला राज्याच्या नावाचा मूळ किंवा अर्थ विचारल्यास भाषाशास्त्र किंवा इतिहासाच्या संदर्भाची गरज नाही. मनापासून सरळ उत्तर देईन. आपला महाराष्ट्र हे भारतातील एक महान राज्य आहे, असे रामनाथ कोविंद म्हणाले.

महाराष्ट्र ही अध्यात्मिक भूमी असून अन्यायाविरुद्ध धैर्याने लढते. ही देशभक्तांची भूमी आहे आणि भागवत भक्तांची भूमी आहे. महाराष्ट्र राज्य हे देशाचे मुख्य आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. या दौऱ्यात मला मोकळेपणा जाणवला, असे ते म्हणाले. अजिंठा-एलुरु लेण्यांची कला असो किंवा पश्चिम घाटातील नैसर्गिक सौंदर्य असो. महाराष्ट्र प्रतिभा आणि निसर्ग संपन्न आहे. येथील आदरातिथ्य प्रसिद्ध आहे. यामुळे मलाच नाही तर देश-विदेशातील अनेकांना महाराष्ट्रात यावेसे वाटते. (हे ही वाचा Mumbai: भारतातील सर्वाधिक गर्दीच्या शहरांमध्ये मुंबई पहिल्या तर जगात पाचव्या क्रमांकावर, बंगळुरू 10व्या आणि दिल्ली 11व्या क्रमांकावर)

गेल्या आठवड्यात माझ्या लाडक्या लतादीदींचे निधन झाले. त्याच्यासारखी महान प्रतिभा शतकात एकदाच जन्माला येते. लतादीदींचे जाणे हे माझे वैयक्तिक नुकसान असल्याची भावनाही राम नाथ कोविंद यांनी व्यक्त केली. राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले की, मी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले.