MHT CET Merit List 2021: आज महाराष्ट्र सीईटी सेल   जारी करणार Round 1 Provisional Merit List; cetcell.mahacet.org वर ती कशी पहाल?
online ((Photo Credits: Pexels)

महाराष्ट्र सीईटी सेल सेल (Maharashtra Common Entrance Test Cell) कडून आज (24 नोव्हेंबर) MHT CET Merit List 2021 ची काऊंसलिंगची पहिल्या फेरीची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल मेरीट लिस्टसाठी (Provisional merit list)आपला आक्षेप नोंदवण्याकरिता 25 ते 27 नोव्हेंबर पर्यंतचा वेळ दिला जाणार आहे. एकदा अंतिम यादी प्रसिद्ध झाली की ती विद्यार्थ्यांना Maharashtra CET ची अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org वर त्यांना पाहता येणार आहे.

यंदा स्टेट सीईटी सेल कडे डाटा सायंस आणि आर्टिफिशिअल इंटेलिजंस या इंजिनियरिंग अ‍ॅप्लिकेशन साठी सर्वाधिक अर्ज आले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 15% वाढ झाली आहे. अंतिम एमएचटी सीईटी मेरीट लिस्ट 2021 आणि प्रोव्हिजनल कॅटेगरी नुसार सीट्स 28 नोव्हेंबर 2021 दिवशी जारी केल्या जाणार आहेत. यावर्षी 1.1 लाख जणांनी इंजिनियरिंग कोर्स साठी अर्ज केले आहेत. मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिक इंजिनियरिंग साठी मागील वर्षीच्या तुलनेत 40% अधिक अर्ज आले आहेत. मग आज जाहीर होणारी पहिली प्रोव्हिजनल एमएचटी सीईटी मेरीट लिस्ट 2021 कशी, कुठे पहाल हे देखील जाणून घ्या.

Round 1 MHET CET Provisional merit list कशी पहाल?

  • अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org ला भेट द्या.
  • होमपेज वरील ‘Undergraduate Courses’ मधील ‘B.Tech/B.E’ला सिलेक्ट करा.
  • नव्या विंडो मध्ये ‘MHT CET Provisional Merit List 2021’ला सिलेक्ट करा.
  • आता तुम्हांला मेरीट लिस्ट चेक करता येईल, डाऊनलोड करता येईल. सोबतच त्याची प्रिंट आऊट देखील काढता येणार आहे.

सध्या अनेक कॉलेजमधून आर्टिफिशिअल इंटेलिजंस, मशिन लर्निंग, डाटा सायंस, द इंटरनेट ऑफ थिंग्स, सायबर सिक्युरिटी आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हे अधिक मागणी असलेले कोर्स सुरू झाले आहेत. MHT CET Merit List 2021 बाबत अधिक अपडेट्स साठी वेबसाईटला भेट देत रहा.