Maharashtra NEET Counselling 2020 : स्टेट कॉमन एंटरन्स टेस्ट सेल महाराष्ट्र आज (13 डिसेंबर) Maharashtra NEET Counselling 2020 second selection list जाहीर करणार आहे. या सिलेक्शन लिस्ट मध्ये दुसर्या राऊंडमध्ये MBBS/ BDS course साठी प्रवेश जाहीर केले जाणार आहेत. ही यादी MAHACET च्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच mahacet.org वर जाहीर केली जाणार आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांना या दुसर्या यादीमध्ये दिलेजाणारे प्रवेश निश्चित करून स्टेट्स रिटेन्शन फॉर्म 18 डिसेंबर पर्यंत भरणं अनिवार्य आहे. दरम्यान मेरीट लिस्ट आज रात्री 8 वाजल्यानंतर जाहीर केली जाईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही या यादीच्या प्रतिक्षेत असाल तर seat matrix result कसा पहाल ते इथे नक्की जाणून घ्या.
Maharashtra NEET Counselling 2020 सिलेक्शन लिस्ट कशी पहाल?
- सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळाला mahacet.org वर भेट द्या.
- त्यानंतर होमपेजवर तुम्हांला NEET UG courses link दिसेल. त्यावर क्लिक करा.
- नव्या पेजवर तुम्ही रिडीरेक्ट व्हाल. तेथे Second selection list पाहून त्यावर क्लिक करा.
- तुमचा निकाल स्क्रिनवर पाहाता येईल.
महाराष्ट्र सीईटी सेलकडून यापूर्वी BAMS/ BHMS/ BUMS/ PT/ OT/ BASLP/ BP & O/ BSc (Nursing)कोर्सची पहिल्या फेरीची सिलेक्शन लिस्ट जाहीर केली आहे. कॉळेजमध्ये जॉईनिंगची अंतिम मुदत 21 डिसेंबर 2020 दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना सार्या डॉक्युमेंट्सची मूळ कागदपत्र, फी वेळेत भरणं आवश्यक आहे.