Photo Credit- X

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या () दहावी-बारावीच्या परीक्षा(SSC-HSC Board Exam) आता महिनाभरावर येऊन ठेपल्या आहेत. यंदा दहावीची बोर्ड परीक्षा (SSC Board Exam) राज्यात 21 फेब्रुवारी पासून तर बारावीची परीक्षा (HSC Board Exam) राज्यात 11 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. बोर्डाकडून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकीट्स जारी केली आहेत. या हॉल तिकीटांवर विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळा आणि परीक्षेचे सेंटर याची माहिती मिळणार आहे. आता पुढील महिन्यात होणार्‍या बोर्ड परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी या परीक्षेचं वेळापत्रक तुमच्याजवळ ठेवा. परीक्षेमध्ये बदल झाल्यास तो बोर्डाकडून कळवला जाईल. सोशल मीडीयात सूत्रांशिवाय फॉरवर्ड केलेल्या कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका. म्हणूनच 10वी, 12वीचं बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक इथे पहा आणि डाऊनलोड करून ठेवा.

महाराष्ट्रात 12वी, 10 वी बोर्ड परीक्षा एकाच वेळी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय शिक्षण मंडळांतर्गत घेण्यात येते. नक्की वाचा: Maharashtra SSC Hall Ticket 2025: महाराष्ट्र एसएससी हॉल तिकीट डाउनलोड लिंक, परीक्षेची तारीख आणि इतर तपशील, घ्या जाणून .

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 (SSC ) परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 आहे, तर इयत्ता 12वी (HSC) परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च आहे. इयत्ता 10वीच्या परीक्षेचा पहिला पेपर भाषा विषयाचा असेल, तर इयत्ता 12 च्या परीक्षांची सुरुवात इंग्रजीच्या पेपरने होणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाच्या HSC परीक्षेसाठी एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये विज्ञान शाखेतील 7,60,046, कला शाखेतील 3,81,982 आणि वाणिज्य शाखेतील 3,29,905 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बारावीची परीक्षा दोन सत्रामध्ये होते. त्यामुळे तुमच्या विषयांनुसार वेळापत्रक नीट पाहूनच परीक्षेला जा.