Exam (Photo Credits: Facebook)

MSBSHSE 12th Result 2021:  महाराष्ट्रा बोर्डाच्या 12वी च्या विद्यार्थ्यांची निकालाची (Maharashtra Board HSC Result) प्रतिक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र बोर्डाचा 2020-21 या शैक्षणिक वर्षाचा निकाल 99.63 % लागला आहे. विज्ञान - 99.45%,कला 99.83%, वाणिज्य 99.91% व्यवसाय अभ्यासक्रम 98.80% लागला आहे. हा नियमित वर्षाचा निकाल आहे.  अगदी 35% गुण मिळालेले 12 विद्यार्थी, 95% पेक्षा जात 1372 आहेत तर राज्यात 6542 कॉलेजचा निकाल 100% लागला आहे. 46 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. 1319754 विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी 1314965 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागात विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.81 टक्के लागला आहे.  तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा निकाल 99.34 टक्के लागला आहे. कोविड संकटामुळे बोर्डाने परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाने परीक्षा निकाल जाहीर केला आहे. बोर्डाने आता पत्रकार परिषद घेऊन केवळ निकालाची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना निकाल दुपारी 4 वाजता ऑनलाईन पाहता येईल. नक्की वाचा: Maharashtra HSC Result 2021: आज बारावीचा निकाल पाहण्यासाठी तुमचा Class 12 Roll Number हा mh-hsc.ac.in वर कसा पहाल?

काही दिवसांपूर्वी दहावी निकाल जाहीर करताना सर्व्हर डाऊन झाल्याने अनेकांना दिवसभर निकाल पाहताच आला नव्हता पण तशी चूक पुन्हा टाळण्यासाठी आज बोर्डाने अधिकृत संकेतस्थळांसोबतच काही थर्ड पार्टी साईट्स  विद्यार्थ्यांसाठी खुल्या केल्या आहेत. https://hscresult.11thadmission.org.in, https://msbshse.co.in, hscresult.mkcl.org, mahresult.nic.in, https://lokmat.news18.com, www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विद्यार्थी दुपारी चार वाजता त्यांचे गुण पाहू शकतात. (नक्की वाचा: Maharashtra Board 12th Result 2021: आज जाहीर होणार बारावीचा निकाल; mahahsscboard.in सह या संकेतस्थळांवर असे पहा ऑनलाईन गुण!).

कसा पहाल आज 12वी चा निकाल?

  • अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • 'HSC results 2021’ चं नवं पेज ओपन होईल.
  • नव्या विंडो वर तुम्हांला विचारलेली माहिती भरा. यामध्ये रोल नंबर आणि आईचं नाव विचारलं जाईल.
  • आता तुम्हांला निकाल  विषय निहाय पाहता येईल.
  • हा निकाल सेव्ह करून ठेवा.

दरम्यान आजचा निकाल हा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने जाहीर केला जात आहे. यामध्ये 10 वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, 11 वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व 12 वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच 12 वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे 12 साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे  त्यावरून आजचा अंतिम निकाल लावला जाणार आहे.