
Maharashtra Board 10th Result 2020: महाराष्ट्रात इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होऊन आता आठवडा होत आला, विद्यापीठ प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुद्धा आज पासून सुरु झाली आहे, अशावेळी इयत्ता दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबत माहिती देताना जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 31 जुलै पर्यंत दहावीचा निकाल जाहीर केला जाईल असे सांगितले होते यानुसार पुढील आठवड्यात निकाल समोर येऊ शकतो. दहावीच्या पेपर तपासणीचे काम पूर्ण झाले आहे, आता निकाल तयार करून जाहीर करण्याचा केवळ अवकाश आहे, हे काम सुद्धा लवकरच पूर्ण करून पुढील आठवड्यात निकाल समोर येईल अशी शक्यता आहे. विद्यार्थी व पालकांना mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल सुद्धा पाहता येणार आहे.
यंदा कोरोनाचे संकट लक्षात घेता महाराष्ट्र शिक्षण बोर्डाकडून दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. या एका विषयात वर्षभरातील परीक्षा व प्रकल्पांच्या अनुसार सरासरीचे मार्क दिले जाणार आहेत. दरम्यान निकाल लागल्यावर तो नेमका कसा तपासून पाहायचा याविषयी स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घ्या.
दहावीचा निकाल कसा तपासून पाहाल?
- अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.
- या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.
- तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.
विद्यार्थ्यी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही तुम्ही निकाल पाहु शकता.